रंग माझा वेगळा मधली कार्तिक ची बहीण खऱ्या आयुष्यात बघा

‘रंग माझा वेगळा’ ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील सौंदर्या इनामदारला कार्तिक आणि आदित्य ही दोन मुले आहेत. परंतु खूपच कमी लोकांना माहीत आहे की, तिला एक मुलगीही आहे जिचे नाव लावण्या आहे. परंतु सौंदर्या तिला तिची मुलगी नाही मनात कारण लावण्याने एका काळ्या मुलाबरोबर लग्न केलेले असते आणि सौंदर्याला काळ्या रंगाचा खूपच तिरस्कार असतो.

परंतु जेव्हा जेव्हा मालिकेत महत्वाचा प्रसंग असतो तेव्हा लावण्या आपल्याला दिसते. आज आपण याच लावण्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. लावण्या ही दिसायला खूपच सुंदर आहे. तिचे नाव शाल्मली तोळे आहे. शाल्मलीचे पूर्ण बालपण मुंबईत गेले आणि तिचे शिक्षण सुद्धा मुंबईमध्येच झाले आहे. कॉलेजमध्ये असताना तिने अनेक नाटक तसेच एकांकिका स्पर्धेत भाग घेतला आहे.

अभिनयाबरोबरच तिला डान्सची सुद्धा खूप आवड आहे. ए आर रहमान तसेच सोनू निगम बरोबर तिने अनेक स्टेज शो केले आहेत. मराठीबरोबर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा काम केले आहे. ‘मैं हुं ना’ या हिंदी चित्रपटात सुद्धा शाल्मली दिसली आहे. खरी प्रसिद्धी स्टार प्रवाहवरील ‘दुर्वा’ या मालिकेमुळे मिळाली. यात तिची भूमिका उत्तम आणि सरस होती. ती झी युवा वरील ‘देवाशप्पथ’ मध्येही दिसून आली.

तसेच हिंदी मालिकांमधील ‘श्री, चुपके चुपके’ मध्येही अभिनय केला आहे. ‘एका पेक्षा एक जोडीचा मामला’ या रिऍलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. तिचे ‘तिन्ही सांज’ हे नाटक खुपच प्रसिद्ध झाले. तसेच ‘स्वराज्य रक्षक संभाजी, मध्ये तीने औरंगजेबाची मुलगी हे पात्र साकारले आहे. थोडक्यात शाल्मलीला अभिनयामध्ये खूप अनुभव आहे. सध्या ती ‘रंग माझा वेगळा’ मध्ये लावण्या हे पात्र साकारत आहे. यातही ती तिची व्यक्तिरेखा उत्तम साकारत आहे.

शाल्मली ही एक डिझायनर सुद्धा आहे आणि झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेसाठी डिझायनर म्हणून काम केले आहे. अनेक कलाकारांबरोबर सुद्धा डिझायनर म्हणून काम केले आहे आणि याबरोबरच सोशल मीडियावरसुद्धा बरीच ऍक्टिव्ह असते. अभिनेता पियुष रांजणे याच्याबरोबर तिचा विवाह झाला होता परंतु काही कारणांमुळे ते काही वर्षांनी वेगळे झाले. मित्रांनो तुम्हाला शाल्मली कशी वाटली, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *