शेवंता पेक्षा सुंदर आहे अण्णाची खरी बायको

‘रात्रीस खेळ चाले ३’ ही झी मराठीवरील मालिका बरेच प्रेक्षक पसंत करत आहेत. ही मालिका भुताच्या संदर्भात आहे. तुम्ही या मालिकेचा प्रोमो पाहूनच घाबरून जाल. याआधीही ‘रात्रीस खेळ चाले भाग १ आणि २’ ला दर्शकांनी बराच प्रतिसाद दिला त्यामुळे आता प्रेक्षकांच्या भेटीस भाग ३ सुद्धा आला आहे. यातील अण्णा नाईक आणि शेवंता यांची जोडी सर्वांच्या आवडीची आहे.

परंतु या अण्णांची खऱ्या आयुष्यातील बायको कोण आहे? तिचे नाव काय आहे? ती काय करते? अशा अनेक गोष्टींची माहिती आपण पुढे घेणार आहोत. अण्णा म्हणजेच माधव अभ्यंकर हे या मालिकेतील मुख्य भूमिकेत आहेत. माधव हे ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे घराघरांत पोहचले. या मालिकेतील सर्व सीजन मध्ये माधव यांनीच अण्णाची भूमिका साकारली आहे. माधव हे मूळचे पुण्याचे आहेत.

परंतु या मालिकेत त्यांना मालवणी भाषा बोलायची होती आणि हे मूळचे पुण्याचे असल्याने त्यांना मालवणी भाषा शिकावी लागली. यासाठी त्यांनी बरीच मालवणी नाटके तसेच अनेक व्यक्तीची मदत घेतली. यांचा पहिला मराठी चित्रपट ‘विश्वविनायक’ हा आहे. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले आहेत ज्यामध्ये ‘या गोल गोल डब्यातला, पोस्टर गर्ल, सुराज्य, तुकाराम आणि यारों की यारी’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

माधव यांनी चित्रपटाबरोबरच नाटकेही केली आहेत. माधव यांच्या बायकोचे नाव रेखा अभ्यंकर आहे. रेखाला जर तुम्ही पाहाल तर ती खूपच सुंदर आहे हे तुम्हाला समजेल. रेखा आणि माधव या दोघांची जोडी खूपच सुंदर आहे. या दोघांनाही दोन मुली आहे. रेखाचा अभिनय क्षेत्राशी काही संबंध नाही. परंतु तिच्याकडे बघून वाटेल की ती खरचं एक अभिनेत्री आहे. या दोघांची सुंदर जोडी आणि छोटेसे कुटुंब असेच सुखाने नांदो ही सदिच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *