Breaking News
Home / कलाकार / या मराठमोळ्या अभिनेत्रीने केला साखरपुडा

या मराठमोळ्या अभिनेत्रीने केला साखरपुडा

या कोरोना महामारी काळात बऱ्याच जणांनी लग्न केली आहेत. यात मग सर्वसामान्य लोक आणि सिनेसृष्टीतील व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी अजून एका मराठी अभिनेत्रीने आयुष्याचा साथीदार निवडला आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव वेदांगी कुलकर्णी आहे. वेदांगीचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अभिषेक तीळगूळकर आहे.

यांचा साखरपुडा १९ मार्च २०२१ ला पुण्यात थाटात पार पडला. तिने या साखरपुड्याचे काही फोटोसुद्धा चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोत दोघेही खूप सुंदर आणि एकमेकांना शोभून दिसत आहेत. चाहत्यांनी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिषेकचा सिनेसृष्टीशी काहीही संबंध नाही. त्याने आजपर्यंत एकही मालिका किंवा नाटक केले नाही.

अभिषेकने इंजिनिअरिंग आणि एमबीए परदेशातून केले आहे. सध्या अभिषेक ऑस्ट्रेलियामध्ये उच्च पदावर काम करत आहे. जर तुम्ही अभिषेकला पाहिले तर समजेल की, तो किती हँडसम आहे. वेदांगी सुद्धा दिसायला खूप सुंदर आहे. वेदांगीने झी मराठीवरील ‘सूर राहू देत’ तसेच स्टार प्रवाहच्या ‘साथ दे तू मला’ या मालिकांत अभिनय करताना दिसली आहे. ‘साथ दे तू मला’ या मालिकेत वेदांगीने प्रमुख भूमिका साकारली आहे.

अभिनयाबरोबरच तिला डान्सची सुद्धा आवड आहे. वेदांगीने झी मराठीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रिऍलिटी शोमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. साखरपुडा झाल्यानंतर लवकरच या दोघांचे लग्न होईल. या दोघांचे लग्न कधी होईल आणि लग्नात काय नवीन असेल का? याची चाहत्यांना ओढ लागली आहे. तुम्हालाही वेदांगी आणि अभिषेक या दोघांची जोडी कशी वाटते? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

About nmjoke.com

Check Also

“रात्री अपरात्री शेतीला पाणी भरतायं? पण, #बिबट्या आणि ईतर प्राण्यांची भीती वाटतीयं? मग, शेतकर्याची हि आयडियाची कल्पना बघाचं!”

“आजकालच्या धावपळीच्या जगात , अत्यंत बेभरवशाचे आयुष्य जगताना सर्वांनाच अनंत अडचणींना तोंड देत आयुष्य जगावे …

Leave a Reply

Your email address will not be published.