Home / कलाकार / बालिका वधू मधली छोटी आनंदी झाली आहे मोठी

बालिका वधू मधली छोटी आनंदी झाली आहे मोठी

कलर्स मराठीवरील ‘बालिकावधू’ ही मालिका तर तुम्ही पाहिलीच असेल. या मालिकेत राजस्थानमधील एका छोट्याशा गावातील कहाणी तुमच्यासमोर मांडली आहे. यामध्ये लहानवयातच मुलांचे लग्न केले जात होते म्हणजेच बालविवाह जो कायद्याने गुन्हा मानला जातो. यामधील आनंदी आणि जग्गया या बालकलाकारांनी प्रेक्षकांची मने मोहून घेतली होती. हे दोघेही त्यावेळी खुपच प्रसिद्ध झाले होते.

मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? हे बालकलाकार सध्या काय करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या छोट्या आनंदीबद्दल की ती सध्या काय करते? कशी दिसते? अशा अनेक गोष्टी. या मालिकेत बालकलाकार आनंदीचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव अविका गौर आहे. जगग्याचे खरे नाव अवनिश मुखर्जी आहे. अविकाचा जन्म ३० जून १९९७ ला मुंबईमध्ये झाला.

रायन इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. अविकाच्या टीव्हीजगातील ‘बालिकावधू’ ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेतील आनंदीची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अविकाला बरेच प्रेम मिळाले. यानंतर तिचा अभिनय पाहून अविकाला बऱ्याच संधी चालून येऊ लागल्या. तिने ‘ससुराल सिमर का, लाडो, लाडो २’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. तिने साऊथ मधील चित्रपटात सुद्धा काम केले आहे.

‘ओयाला जमापला’ हा त्यातील एक आहे. बालकलाकार म्हणून अविका ही चांगलीच गाजली होती. लहान असताना अविका सुंदर दिसतच होती परंतु आता ती त्याहीपेक्षा सुंदर दिसत आहे. अविका ही स्टायलिश कपडे घालते तसेच उत्तम राहतेसुद्धा. इन्स्टाग्राम तसेच फेसबुक वर सुद्धा ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी अपडेट देत असते. तिने अजूनही लग्न केले नसून ती मुंबईत स्थायिक आहे. तुम्हालाही ही मोठी आनंदी कशी वाटते नक्की सांगा.

About nmjoke.com

Check Also

आयेशा ची बहीण पाहून तिच्यामागे वेडे व्हाल

स्टार प्रवाहवरील सुप्रसिद्ध मालिका ‘रंग माझा वेगळा’ ही दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे. मालिकेत अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *