येऊ कशी तशी मी नांदायला मधला रॉकी खऱ्या आयुष्यात पहा

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही झी मराठी वरील मालिका घराघरांत पोहचली आहे. असे दिसून येत आहे की, या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड पसंत केले आहे. या मालिकेतील रॉकी, मालविका ही पात्रे बरीच चर्चेत आहेत आणि आता आपण येथे रॉकीच्या आयुष्यातील काही माहिती जाणून घेऊयात. सध्या रॉकीचा एक फोटो खुपच वायरल होत आहे.

त्या फोटोमध्ये रॉकी एका प्रसिद्ध कलाकाराच्या मुलांबरोबर आहे. ही मुले प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आहेत. अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे हे दोघेही खूप क्युट दिसत आहेत. यांच्याबरोबर फोटो काढण्याचे मुख्य कारण म्हणजे रॉकीचे आईवडील हे प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ओळखीचे होते. त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे त्यामुळे बेर्डे कुटुंबाबरोबर रॉकीच्या परिवाराचे चांगले संबंध आहेत.

रॉकीचे खरे नाव त्रियोग मंत्री आहे. त्याच्या वडिलांचे नाव नितीन मंत्री तर आईचे नाव सुलभा मंत्री आहे. सुलभा यांनी ‘प्रेमासाठी वाट्टेल ते, आधारस्तंभ, दामिनी, आमची माती आमची माणसं, चोरबाजार’ असे अनेक चित्रपट आणि मालिका केल्या आहेत. रॉकीला एक बहीण आहे जीचे नाव नेश्मा मंत्री आहे तीसुद्धा एक अभिनेत्री आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही रॉकीची पहिली मराठी मालिका आहे. याआधी त्याने ‘सीआयडी, अदालत, सम्राट अशोक, महाराणा प्रताप’ अशा अनेक हिंदी मालिकांत अभिनय केला आहे. या त्याच्या मराठी मालिकेतील कारकीर्द सुद्धा गाजावी ही सदिच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *