Breaking News
Home / कलाकार / मराठमोळ्या अमृता खानविलकरचा नवरा मराठी नाही पहा

मराठमोळ्या अमृता खानविलकरचा नवरा मराठी नाही पहा

प्रेमाला काही मर्यादा नसते. प्रेम कधी आणि कोणावर होईल, हेही नाही सांगू शकत. तसेच प्रेम हे जातपात, धर्म आणि भाषा बघून नाही केले जात. ती मनातून आलेली एक भावना असते की, हो हीच आहे ती व्यक्ती जी मला माझ्या आयुष्यात मला साथ देईल, प्रत्येक सुखदुःखात एकत्र राहील आणि हीच एक अशी व्यक्ती आहे जिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मित्रांनो, तुम्हालाही कधी कोणावर प्रेम झाले असेल, कोणीतरी तुम्हाला आवडले असेल, हो ना?

बॉलीवूडमध्येही अशा अनेक जोड्या आहेत ज्यांचे प्रेम आजही एक उदाहरण आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्याच्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची पत्नी मराठमोळी अभिनेत्री आहे. त्या अभिनेत्याचे नाव हिमांशू मल्होत्रा आहे. हिमांशू हा एक पंजाबी आहे तरीही त्याचा जीव एक मराठमोळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आला जिचे नाव अमृता खानविलकर आहे.

मराठी चित्रपटसृष्टी मधून तसेच मालिकांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्री आहे. हिमांशू हा सुद्धा बॉलीवूडमध्ये तसेच मालिकांमध्ये अभिनय करतो. यांची झी टीव्हीवरील ‘इंडिया सिनेस्टार’ या शोमध्ये पहिली भेट २००४ ला झाली. या दोघांच्याही करिअरची सुरुवात त्यावेळी झाली होती. हळूहळू नकळत मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनाही माहीत नव्हते की, यांचे हे प्रेम एकमेकांना लग्नाच्या बंधनात सुद्धा अडकवले.

वेगळी भाषा, वेगळी संस्कृती असूनही हे दोघे घरच्यांच्या आग्रहास्तव एकत्र आले आणि लग्न केले. या दोघांनी १० वर्ष एकमेकांना डेट केले. या वर्षांत अनेक चढउतार, भांडण झाली पण प्रेमापुढे हे काही टिकत नसते. त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. २४ जानेवारी २०१५ ला दिल्ली येथे त्यांचा लग्नसोहळा पंजाबी तसेच हिंदू पद्धतीत धुमधडाक्यात पार पडला.

हिमांशू आणि अमृता ही जोडी ‘नच बलीये’ या शोची विजेती आहे. हे दोघेही आपल्याला चित्रपट, रियालिटी शो तसेच मालिकांमधून आपल्याला भेटायला येत असतात. ही जोडी अजूनही एकत्र सुखाने संसार करत आहे. तुम्हालाही हिमांशू आणि अमृताची जोडी कशी वाटते? आम्हाला नक्की कळवा.

About nmjoke.com

Check Also

भाभी ने चालवली बुलेट रोड वर सगळे बघत राहिले

सोशल मीडियावर एक एक व्हिडिओ शेअर आणि व्हायरल होत आहेत. त्यापैकी बहुतेक असे आहेत की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *