यामुळे शुब्रा ने आगगाबाई सासूबाई मालिका सोडून दिली

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बऱ्याच नवीन मालिका येत असतात. अशीच अजून एक नवीन मालिका झी मराठीने आपल्या करमणुकीसाठी काढली आहे ती म्हणजे ‘आग्गबाई सुनबाई’. याआधी ‘आग्गबाई सासूबाई’ या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली आणि ही नवीन मालिका तशीच असेल की यात काही वेगळं दाखवलं जाईल याकडे दर्शकांचे लक्ष लागले आहे. या मालिकेतील शुभ्रा, बबड्या, त्याचे आई आणि वडील हे त्यांच्या उत्तम अभिनयाने बरेच प्रसिद्ध झाले.

या नवीन येणाऱ्या ‘आग्गबाई सुनबाई’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी बऱ्याच वेगळ्यावेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. प्रोमोमधून समजून आले की, या मालिकेतील शुभ्राची भूमिका तेजश्री प्रधान ही साकारणार नसून तिच्याजागी तुम्हाला यावेळी वेगळी शुभ्रा दिसणार आहे. हे पात्र यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री उमा पेंढारकर साकारणार आहे.

परंतु तेजश्री प्रधान हिला या मालिकेतून एवढी प्रसिद्धी मिळत असूनही, ही मालिका का सोडली असावी? अशी शंका चाहत्यांच्या मनात आहे. शेवटी सगळ्यांना आयुष्यात पुढे जायचे असते, वेगळी वेगळी ध्येय पूर्ण करायची असतात तसेच काहीसे तेजश्री बरोबर झाले आहे. तेजश्री आता आपल्याला बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिचा अभिनेता शर्मन जोशी सोबतचा ‘बबलू बॅचलर’ हा चित्रपट येणार आहे.

हा चित्रपट २०२० मध्येच रिलीज होणार होता परंतु कोरोना महामारीमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षी तो ‘बबलू बॅचलर’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. तेजश्री या चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याने तिने ‘आग्गबाई सुनबाई’ ही मालिका केली नसावी असा अंदाज बांधण्यात आला आहे. तुम्हालाही ती नवीन शुभ्रा कशी वाटते? या शुभ्रालाही तेजश्री प्रधान एवढे प्रेम मिळेल का? तुम्हाला काय वाटते नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *