शाहरुखच्या मुलीचे हे फोटो होत आहेत वायरल

बॉलीवूड बादशाह म्हणजेच शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सध्या खूपच चर्चेत आहे. सुहाना सुद्धा शाहरुख खानसारखं प्रसिद्ध होत आहे. सुहाना ही तिच्या हॉट दिसण्यामुळे आणि स्टायलमुळे तरूणाईच्या मनात घर करत आहे. एका प्रसिद्ध कलाकाराचे चाहते जेवढे असतात तेवढे सुहानाचे झाले आहेत. सुहाना ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते आणि तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते.

तिचे अनेक फोटो वायरल होत आहेत. जुने फोटोसुद्धा ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. आत्ताही असाच सुहानाने एक नवीन फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे ज्यात तिने सांगितले आहे की, तो आरश्यातला फोटो आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. त्या आरश्यातील फोटोमध्ये तिने पांढराशुभ्र शॉर्ट टॉप घातला आहे आणि तो तिला खूपच चांगला दिसत आहे. यात तिचे केस पण तुम्ही पाहाल तर तिने त्यांना सुद्धा स्टायलमध्ये दाखवले आहे.

तिच्या बाकी फोटोंप्रमाणेच हा फोटोसुद्धा चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. सुहानाचे अजूनही असे बरेच फोटो आहेत ज्यात ती खूपच हॉट दिसते आणि तिच्या चाहत्यांनी त्यांवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. परंतु याबरोबरच तिचे असेही फोटो खूप वायरल गेले आहेत ज्यात तिला जनतेने खूप ट्रोल केले आहे. तिचा न्यूयॉर्क मधला तिच्या मैत्रिणीबरोबरचा पार्टीचा फोटोसुद्धा वायरल होत आहे ज्यात तिने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे.

न्यूयॉर्कमध्ये ती खूप पार्ट्या करत असते. याआधीही तिने न्यूयॉर्कमधील पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी टाकले आहेत. सुहानाचा जन्म २२ मे २००० ला झाला म्हणजेच ती सध्या २०च वर्षांची आहे तरीही तिचे चाहते एवढे आहेत, हे कौतुकास्पद आहे. तिची फॅशन, स्टायल तसेच मेकअप हा अतिशय सुंदर असतो त्यामुळे तिला अजूनच सुंदर दिसण्यात मदत होते. तुम्हालाही ही हॉट सुहाना कशी वाटते? तुम्ही तिच्याबद्दल काय विचार करता आम्हाला सांगायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *