सलमान खान ची हि हिरोईन आता किती हॉट दिसते आणि काय करते पहा

‘एक बार जो मैने कमिटमेंट करदी तो मैं खुदकी भी नही सुनता’ हा प्रसिद्ध डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल आणि चित्रपटही पाहिला असेल. या चित्रपटाचे नाव आहे ‘वॉन्टेड’ जो २००९ मध्ये आली. यामध्ये जेवढ्या कलाकारांनी अभिनय केला आहे तो अगदी बारकाईने केला त्यामुळेच आजही हा चित्रपट तेवढ्यात आवडीने पाहिला जातो जेवढा रिलीज झाल्यावर पाहिला गेला होता.

यात एक पात्र होते – जान्हवीचे जिने लाखो तरुणाईचे मन जिंकले. पण आज ही तरुणाईला वेडी करून टाकणारी जान्हवी आज कुठे आहे? काय करते? चला तर मग जाणून घेऊयात. ‘वॉन्टेड’ या चित्रपटात सलमान खानबरोबर अभिनय करणाऱ्या जान्हवीचे खरे नाव आयेशा टाकिया आहे. आयेशाचा जन्म १० एप्रिल १९८६ ला मुंबईत झाला. चेंबूरमधील अँथनी हायस्कूल मधून शिक्षण पूर्ण केले. आयेशा ही अभिनयाबरोबरच एक मॉडेल सुद्धा आहे.

तिचे वडील हिंदू तर आई मुस्लिम आहे. ‘टारझन : द वंडर कार’ हा तिचा २००४ मध्ये आलेला पहिला चित्रपट आहे. ‘सोचा ना था, डोर, वॉन्टेड, संडे, पाठशाला’ असे अनेक हिंदी चित्रपट केले तसेच तेलुगू मध्ये तिने ‘सुपर’ या चित्रपटात नागार्जुन बरोबर काम केले. २०१३ मध्ये आलेली ‘आपके लिये हम’ यामध्ये तिला शेवटचे काम करताना पाहिले आहे. १ मार्च २००९ ला तिचे फरहान आझमी बरोबर लग्न झाले.

फरहान हा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. आज आयेशाला बॉलीवूडला सोडून सात वर्षे होऊन गेली. आयेशा आणि फरहान यांना एक सुंदर असा मुलगाही आहे. आयेशाचा आता चित्रपटसृष्टीत परत यायचा काही विचार नाहीये. आत्ता ती आधीपेक्षाही खूपच सुंदर दिसत आहे. तुम्हाला काय वाटते की आयेशाने अजून एकदा बॉलीवूडमध्ये यावे का? कमेंटमध्ये आम्हाला तुमचे मत नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *