Home / कलाकार / कपिल शर्मा ची बायको पाहून वेडे व्हाल

कपिल शर्मा ची बायको पाहून वेडे व्हाल

मित्रांनो आजकाल सर्वजण आपल्याला दुःख तर देऊ शकतात पण हसवण्याची कला खूप कमी जणांमध्ये असते. अशा हसवणाऱ्या व्यक्ती आपल्याला जवळ नेहमी असाव्यात असे नेहमी वाटते. अशीच एक व्यक्ती आहे कपिल शर्मा. कपिल शर्मा म्हणले की, आपल्याला खळखळून हसवणारा एक व्यक्ती डोळ्यासमोर दिसतो.

‘द कपील शर्मा शो’ या घराघरांतील आवडीचा कार्यक्रम आहे, जे संपूर्ण कुटुंब बसून एन्जॉय करत बघत असतो. आपल्याला कपिल शर्माबद्दल तर बरंच काही माहिती आहे परंतु त्याच्या पत्नीबद्दल फारच कमी जणांना माहिती आहे. कपिलचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले आणि त्याला आता एक मुलगाही आहे. आज आपण येथे कपिलच्या पत्नीबद्दल माहिती करून घेणार आहोत. तिचे नाव गीन्नी चत्राठ आहे.

गीन्नी आणि कपिल यांचे १२ डिसेंबर २०१८ ला हिंदू आणि शीख रितींप्रमाणे लग्न झाले. यांना एक मुलगा आहे त्याचे नाव अनार्य शर्मा आहे. त्याचा जन्म १ फेब्रुवारी २०२१ ला झाला. गीन्नी दिसायला खूप सुंदर आहे तसेच त्यांचा मुलगाही आहे. गीन्नीचा जन्म १८ नोव्हेंबर १९८९ ला झाला आहे. पंजाबमधील जलंधर येथे तिचा जन्म झाला. जलंधरमधील एमजीएन पब्लिक स्कुल मधून तिने शालेय शिक्षण घेतले.

गुरुनानक देव युनिव्हर्सिटी, अमृतसरमधून कॉलेजचे शिक्षण घेतले आणि फायनान्स मधून एमबीए पूर्ण केले. गीन्नी सुद्धा एक कॉमेडियन आहे त्याबरोबरच ती एक उद्योजकसुद्धा आहे. २००९ च्या ‘हंस बलीये’ या टीव्ही शोमध्ये तिने भाग घेतला होता. यांचे कुटुंब असेच एकत्रित राहावे ही सदिच्छा. तुम्हालाही या दोघांची जोडी कशी वाटते, आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.