सैफ ची मुलगी सारा अली खान चा बॉयफ्रेंड

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी म्हणजेच सारा अली खान ही काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये आली. परंतु काही वेळातच तिने प्रसिद्धी मिळवली आहे जे करणे खूप कठीण आहे. साराने स्वतःच्या बळावर तिच्या अभिनयामुळे ही प्रसिद्धी मिळवली आहे. अतिशय उत्तम अशा अभिनयामुळे कमी कालावधीतच तिचे खूप चाहते बनले आहेत.

ती नेहमी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते. असाच एक अभिनेता सुद्धा आहे, ज्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो म्हणजे कार्तिक आर्यन आहे. कार्तिक आणि सारा या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूपच पसंती दिली आहे. बऱ्याच मुलाखतीत दोघांनाही एकमेकांबद्दलचेच प्रश्न विचारले जातात.

एका चित्रपट प्रमोशनवेळी सारा ‘कॉफी विथ करण’ च्या शोमध्ये गेली होती आणि तिथे तिला प्रश्न विचारण्यात आला असता तिने सांगितले होते की, कार्तिक आर्यनवर तिला क्रश आहे आणि तिला कार्तिकला डेट करायचे आहे. त्यावेळी तिचे वडील म्हणजेच सैफ अली खान सुद्धा हजर होते. यानंतर काही दिवसांनी समजले की, दोघेही चांगल्या रिलेशनशिपमध्ये आहेत आणि एकमेकांना पसंत करतात. त्या दोघांनी ‘लव्ह आजकल २’ हा चित्रपट सुद्धा केला ज्यात ते आपल्याला एकत्र दिसत आहेत.

हा चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर जास्त चालला नसला तरी त्या दोघांची केमिस्ट्री मात्र सगळ्यांना भावली आहे. या चित्रपटाशी संबंधित इव्हेंट्स तसेच प्रमोशनवेळी दोघांना खूप ठिकाणी एकत्रित पाहायला मिळाले. या दोघांच्या जोडीला सार्तीक असेही म्हणले जाते. याया दोघांचे बरेच विडिओ सोशल मीडियावर आहेत ज्यावरून आपल्याला समजते की ते एकमेकांच्या किती प्रेमात पडले आहेत. इन्स्टाग्रामवर सुद्धा यांच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे. तुम्हालाही ही सार्तीकची जोडी कशी वाटते, आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *