Home / कलाकार / माझा होशील ना या मालिकेतील कलाकार खऱ्या आयुष्यात

माझा होशील ना या मालिकेतील कलाकार खऱ्या आयुष्यात

झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. सई आणि आदित्य या दोघांची जोडी लोकांना खूपच आवडत आहे. सई हे पात्र अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने साकारले आहे. प्रतिभा देशपांडे हे तिच्या आईचे नाव आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हि तीची मोठी बहीण आहे. आदित्यची भूमिका अभिनेता विराजस कुलकर्णी साकारत आहे.

विराजस हा अतिशय प्रसिद्ध अशा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. मृणाल कुलकर्णी यांनी आजपर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे परंतु त्यांची ‘सोनपरी’ ही मालिका बऱ्याच जणांच्या अजूनही लक्ष्यात असेल. बंधू मामा ही भूमिका सुनील तावडे यांनी साकारली आहे. सईचे डॅडी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव अतुल काळे आहे.

पिंट्या मामा ही भूमिका अभिनेता निखिल रत्नपारखी याने साकारली आहे. निखिल यांचाही अभिनय खूप उत्तम आहे. त्याच्या बायकोचे नाव भक्ती आहे. दादा मामा ही भूमिका अतिशय प्रसिद्ध आणि मनमिळाऊ कलाकार म्हणजेच विद्याधर जोशी यांनी साकारली आहे. विद्याधर यांना आपण मराठी बिगबॉस मध्ये सुद्धा सहभागी झालेले पाहिले आहे. त्यातून तुम्हाला त्यांचा समंजसपणा आणि स्वभाव सुद्धा समजला असेल. अभिनेत्री सीमा देशमुख आणि त्यांचा नवरा श्रीरंग देशमुख आहे.

श्रीरंग हे सध्या आपल्याला ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत कार्तिक आणि आदित्य या दोघांचे बाबा असण्याची भूमिका करत आहेत. सईच्या आईची भूमिका अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी साकारली आहे. सुयशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्र्याचे नाव आशय कुलकर्णी आहे. तर अभिनेत्री मुग्धा पुराणिक ही नैनाची भूमिका साकारत आहे. तर मित्रांनो तुम्हालाही ‘माझा होशील ना’ ही मालिका कशी वाटते तसेच सई आणि आदित्य यांची जोडी तुम्हाला आवडते का? हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.