अमोल कोल्हे ची बायको पहा कशी दिसते

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने अतिशय उत्तम प्रकारे साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्या अभिनेत्याचे नाव आहे डॉ अमोल कोल्हे. अमोल कोल्हे हे एक असे खासदार आहेत ज्यांना लोकांच्या अडचणी समजून घेता येतात तसेच ते उत्कृष्ट वक्ता म्हणून देखील ओळखले जातात. एक अभिनेता ते यशस्वी राजकारणी व्यक्ती बनण्यापर्यंत त्यांनी खूप कष्ट घेतले.

डॉ अमोल कोल्हे मूळचे पुणे जिल्ह्यातील नारायण गावातले आहेत. त्यांचा जन्म १८ सप्टेंबर १९८० ला झाला. वडिलांचे नाव रामसिंग कोल्हे तर आईचे नाव रंजना कोल्हे आहे. प्राथमिक शिक्षण हे नारायणगाव मधूनच झाले नंतर त्यांनी पुण्यातून हायस्कुलचे शिक्षण घेतले. ते अभ्यासात खूप हुशार होते. पुढे एमबीबीएस ची पदवी घेण्यासाठी मुंबईत पाऊल टाकले आणि डॉक्टर झाले. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेपासून अमोल यांना खूप प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत त्यांनी संभाजीची भूमिका केली. अगदी वास्तवदर्शी अशी संभाजी आणि शिवाजी महाराज यांच्या भूमिका यांनी या मालिकेत साकारली आहे. या दोन महाराजांचा थरारक इतिहास त्यांच्या उत्तम अभिनयातून लोकांसमोर आणला. त्यांच्या उत्कृष्ठ वक्तृत्व शैलीमुळे त्यांना राजकारणात सुद्धा स्थान मिळाले आणि २०१९ ला ते खासदार झाले.

या पूर्ण प्रवासात त्यांचा आधारस्तंभ म्हणून नेहमी पाठीशी असणाऱ्या त्यांच्या पत्नी आश्विनी कोल्हे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सुखदुःखात त्या सावलीसारख्या उभा राहिल्या. ६ डिसेंबर २००७ ला अमोल यांचा आश्विनीबरोबर विवाह झाला. आश्विनी या सुद्धा एक डॉक्टर आहेत आणि एक वैद्यकिय महाविद्यालयात त्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी करतात.

अमोल यांच्या प्रत्येक निर्णयात आश्विनी खंबीरपणे उभ्या असतात. एकदा पत्नीबद्दलचे प्रेम व्यक्त करताना अमोल कोल्हे म्हणाले की, ‘माझी पत्नी म्हणजे माझा बोलका आरसा आहे. प्रसिद्धीने झळाळतही नाही आणि अपयशाने झाकोळतही नाही. माझं घरटं सांभाळून भरारीची उमेद देते.’ असे बरेच कौतुकास्पद शब्द त्यांनी बोलले. या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *