aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

देवमाणूस मधील दिव्या खऱ्या आयुष्यात किती सुंदर दिसते पहा

‘देवमाणूस’ ही झी मराठीवरील एक प्रसिद्ध आणि प्रेक्षकांच्या आवडीची मालिका बनली आहे. या मालिकेत विविध घटना दाखवल्या आहेत ज्याची तुम्हाला पुढे काय होईल हे पाहण्याची नेहमीच उत्सुकता असेल. ‘देवमाणूस’ या मालिकेची निर्माती श्वेता शिंदे ही आहे. याच मालिकेतील दिव्या हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

दिव्या ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव नेहा खान आहे. ती अभिनयाबरोबरच मॉडेलिंग सुद्धा करते. नेहाचा जन्म १३ ऑगस्ट १९९५ ला झाला आणि सध्या तिचे वय २५ वर्षांच्या आसपास आहे. तिचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. तिचे शालेय शिक्षण राजेश्वरी विद्या मंदिर, अमरावती येथून पूर्ण झाले आहे तर हायस्कूलचे शिक्षण मुंबई विद्यापीठातुन झाले आहे. तिने कॉमर्स मध्ये पदवी प्राप्त केली आहे.

शाळेत तसेच हायस्कुलमध्ये असताना तिने बऱ्याच नाटकात आणि डान्स स्पर्धेत भाग घेतला आहे. ‘गुरुकुल’ या २०१५ मध्ये आलेल्या चित्रपटात तिने पहिल्यांदा काम केले. २०१८ ला आलेल्या ‘शिकारी’ या चित्रपटात सुद्धा तिने अभिनय केला आहे. ‘देवमाणूस’ ही तिची पहिलीच छोट्या पडद्यावरील मालिका आहे.

ज्या मालिकेत ती दिव्या हे पात्र अतिशय उत्तम पद्धतीने साकारत आहे. तिला अभिनयाबरोबरच नृत्याचीही आवड आहे. युवा डांसिंग क्वीन २०१९ मध्ये तिने सहभाग घेतला होता. तिला जिममध्ये जायला सुद्धा खूप आवडते आणि त्यामुळेच ती आपल्याला एवढी फिट दिसते. तुम्हालाही ही दिव्या म्हणजेच नेहा कशी वाटते, कमेंट मध्ये जरूर सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *