मराठमोळ्या सोनाली बेंद्रे चा नवरा पहा कोण आहे

मित्रांनो, तुम्ही बॉलीवूडमध्ये सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय देवगण यांचा ‘दिलजले’ हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटात अजय देवगण हे मुख्य भूमिकेत आहेत. अजय यांच्या प्रेमाबद्दलची आहे आणि याच प्रेमाला मिळवण्यासाठी ते त्यांच्या वडिलांना सुद्धा गमावून बसतात. यामुळे अजय हे आतंकवादी बनतात.

हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला कारण यात बाकी कलाकारांनी सुद्धा बरीच मेहनत घेतली आणि त्यातलीच एका मुख्य कलाकाराची माहिती येथे आपण पाहणार आहोत. राधिका हे मुख्य पात्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने साकारले आहे. सोनालीने या व्यतिरिक्त अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. येथे आज आपण सोनाली बेंद्रेच्या नवऱ्याबद्दल माहिती घेणार आहोत.

तिच्या नवऱ्याचे नाव गोल्डी बेहल आहे. सोनाली आणि गोल्डीचे लग्न २००२ मध्ये झाले. गोल्डीचा जन्म २४ जानेवारी १९७५ ला मुंबईमध्ये झाला. गोल्डी हा डायरेक्टर, स्क्रीनरायटर तसेच प्रोड्युसर आहे. ‘बस इतनासा ख्वाब है’ या अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, जॅकी श्रौफ आणि सुष्मीता सेन यांच्या चित्रपटाला डायरेक्ट केले आहे. ‘द्रोणा’ आणि ‘आय, मी और मैं’  हे चित्रपट आहे ज्यासाठी गोल्डीने डायरेक्टर म्हणून काम केले.

गोल्डी हा डायरेक्टर रमेश बेहल यांचा मुलगा आहे. अभिनेता रवी बेहल आणि अभिनेत्री गीता बेहल हे त्याचे चुलत भाऊ बहीण आहेत. गोल्डी आणि सोनाली यांचे लग्न १२ नोव्हेंबर २००२ ला झाले. या दोघांनाही एक मुलगा आहे, त्याचे नाव रणवीर आहे. रणवीरचा जन्म ११ ऑगस्ट २००५ ला झाला. यांच्या छोट्या आणि सुखी कुटुंबाला कोणाची नजर लागू नये ही सदिच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *