मराठमोळ्या पद्मिनी कोल्हापुरे चा मुलगा पहा कोण आहे

बालकलाकार म्हणून काम करायला चालू केलेल्या तसेच मोठे झाल्यावरही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका असलेल्या पद्मिनी कोल्हापुरेला कोण नाही ओळखत. पद्मिनी ही एक मराठमोळी अभिनेत्री आहे. तिला अभिनयाबरोबरच संगीताचे सुद्धा खूप ज्ञान आहे. १९६५ ला पद्मिनी यांचा जन्म झाला. यांना अजून दोन बहिणी आहेत ज्यांची नावे तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी कोल्हापुरे आहेत.

यांचे वडील पंढरीनाथ कोल्हापुरे हे एक सुप्रसिद्ध संगीतकार आहेत. पद्मिनी या महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील आहेत. घरात संगीताचे वातावरण असल्याने त्यांनी सुद्धा संगीताचे शिक्षण घेतले आणि बरीच गाणी सुद्धा गायली आहेत. या कुटुंबाचे मंगेशकर कुटुंबाशी सुद्धा जवळचे संबंध आहेत. ‘यादो की बारात, किताब, दुश्मन दोस्त, ड्रीम गर्ल, सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.

राजेश खन्ना, मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त यांसारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर पद्मिनी यांनी अभिनय केला आहे. प्रदीप शर्मा बरोबर त्यांचे १९८६ ला लग्न झाले. त्यांच्या मुलाचे नाव प्रियांक शर्मा आहे. प्रियांकचा जन्म ४ फेब्रुवारी १९९० ला झाला. प्रियांकने ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या चित्रपटासाठी सहाय्यक फिल्ममेकर म्हणून काम केले आहे. वयाच्या १४ व्या वर्षांपासून त्याला चित्रपटांसाठी संधी येत होत्या परंतु त्याला ते करायचे नव्हते. ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटात त्याने अभिनय केला.

प्रियांकचे लग्न प्रोड्युसर करीम मोरानी यांच्या मुलीबरोबर म्हणजेच शाझा मोरानी ४ फेब्रुवारी २०२१ ला मुंबईमध्ये झाले. प्रियांकचा वाढदिवस सुद्धा ४ फेब्रुवारी याच दिवशी असतो. या दोघांचे कोर्ट मॅरेज झाले आहे. इन्स्टाग्रामवर त्याने त्याचे लग्न झाले आहे अशी पोस्ट सुद्धा टाकली. प्रियांक आणि शाझा हे दोघेही न्यूयॉर्कच्या फिल्म स्कूल मध्ये भेटले होते आणि बरेच वर्ष एकमेकांना डेट करत होते. शाझा ही सुद्धा एक असिस्टंट डायरेक्टर आहे. तिने ‘हॅप्पी न्यू इअर’ या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *