लाडाची मी लेक ग या मालिकेतील कस्तुरी खऱ्या आयुष्यात

झी मराठीवरील ‘लाडाची मी लेक ग’ ही मालिका तुम्ही पाहिली असेलच. या मालिकेत अतिशय उत्तम कलाकार आहेत आणि त्यांचा अभिनयही तेवढाच उत्तम आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री मिताली मयेकर आहे. चला तर मग जाणून घेऊया या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री मिताली मयेकर बद्दल. मितालीचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ ला मुंबईमध्ये दादरला झाला. बालमोहन विद्यालयामधून मितालीचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे.

शाळेत असताना तिने विद्याताई पटवर्धन यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले. लहानपणापासून तिला अभिनयाची आवड असल्यामुळे तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. इरफान खान आणि लारा दत्ता यांच्यासोबत तिने ‘बिल्लू बार्बर’ या चित्रपटात अभिनय केला आहे. मितालीने यात त्या दोघांच्या मुलीची भूमिका साकारली आहे जी प्रेक्षकांना खूप आवडली. रामनारायन रुहिया या कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे.

कॉलेजमध्ये असताना तिने अनेक एकांकिका आणि नाटकात काम केले आहे. दहावी आणि बारावीच्या अभ्यासामुळे तिने काही दिवस ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती ‘उर्फी’ या चित्रपटात आपल्याला दिसून आली. उर्फीमध्ये तिने अमृता हे पात्र साकार केले. या चित्रपटात मिताली बरोबर प्रथमेश परब हा प्रमुख भूमिकेत होता. या दोघांच्या प्रेमाची केमिस्ट्री बऱ्याच तरुणाईला आवडली. यानंतर ‘यारी दोस्ती, आम्ही बेफिकिर’ या चित्रपटात ती दिसून आली. यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक आपल्याला दिसून आला.

तसेच झी युवावरील ‘फ्रेशर्स, या मालिकेत तिने सायली हे पात्र साकार केले. यामुळे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली. तिने नंतर बऱ्याच मालिकांमध्ये अभिनय केला. ‘उंच माझा झोका, तू माझा सांगती, भाग्यलक्ष्मी, असंभव’ या तिच्या काही प्रमुख मालिका आहेत. मिताली आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघे ऑस्ट्रेलियाला गेले होते. त्यावेळचे रोमॅंटिक शूटिंगचे फोटो सुद्धा तिने पोस्ट केले आहेत. त्या दोघांचा २०१९ मध्ये साखरपुडा झाला होता.

सिद्धार्थ आणि मिताली २४ जानेवारी २०२१ ला लग्नबंधनात अडकले आहेत. अतिशय धुमधडाक्यात त्यांचे लग्न पार पडले. त्यांच्या लग्नाचे तसेच लग्नामध्ये होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे फोटो तर तुम्ही पाहिलेच असतील. मिताली ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते आणि तिच्या चाहत्यांना नेहमी नवीन नवीन अपडेट देत असते. तुम्हालाही ही कस्तुरी म्हणजेच मिताली कशी वाटते आम्हाला नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *