शुभमंगल ऑनलाईन मधल्या ऐश्वर्याला पहा किती हॉट दिसते

सध्या कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये सर्वच जण अतिशय उत्तम भूमिका साकारत आहेत. त्यातलंच एक पत्र आहे ऐश्वर्याच. शंतनु आणि शर्वरी यांच्या प्रेमामधील अडथळा म्हणजे ऐश्वर्या आहे. ऐश्वर्या ही भूमिका जिने साकारली आहे ती अभिनेत्री हे पात्र अतिशय उत्तमरीत्या साकारत आहे. आज आपण त्याच अभिनेत्रीबद्दल येथे माहिती घेणार आहोत. ऐश्वर्याचे खरे नाव समिधा गुरू आहे.

आजपर्यंत अभिनेत्री समिधा यांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा अनेक ठिकाणी अभिनय केला आहे. उत्तम अभिनयामुळे त्या आज एक चांगली अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. ‘सोनियाचा उंबरा’ या मालिकेतून त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली. या ‘सोनियाचा उंबरा’ मध्ये समिधाने सुकन्या ही भूमिका साकारली होती. यानंतर त्यांना अभिनयासाठी बऱ्याच संधी चालून आल्या. ‘अवघाची संसार’ ह्या मालिकेने त्यांच्या आयुष्यात महत्वाचा भाग घेतला आहे.

यामध्ये त्या इन्स्पेक्टर नेहा हे पात्र साकारताना दिसल्या. यानंतर त्यांनी अनेक भूमिका अनेक मालिकांमध्ये साकारल्या. ‘देवयानी’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली. तसेच ‘झुंज, या वळणावर, तुजविण सख्या, कमला’ या मालिकांमध्येही काम केले. या मालिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या उत्तम अभिनयाची छाप टाकली आहे. सोनीवरील ‘क्राईम पेट्रोल’ मध्येही त्या दिसल्या आहेत.

‘लाल ईश्क, पन्हाळा, तुकाराम, कायद्याचं बोला, कापूस कोंड्याची गोष्ट’ या चित्रपटांमध्येही त्या दिसून आल्या. ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ यासाठी त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. ‘थोडं तुझं थोडं माझं, तळ्यात मळ्यात, गेट वेल सून’ ही नाटकेही केली आहेत. त्यांच्या पतीचे नाव अभिजित गुरू आहे. अभिजितला आपण ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत केडीच्या भूमिकेत पाहिले आहे. सध्या समिधा कलर्सवरील ‘शुभमंगल सावधान’ या मालिकेत ऐश्वर्याची भूमिका साकारत आहे. तुम्हालाही तिची भूमिका कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *