हि व्यक्ती नसती तर आमिर खान आज कोणाच्याच ओळखीचा नसता

बॉलीवूड सुपरस्टार आणि परफेक्ट अभिनेता म्हणजे आमिर खान. आज आपण येथे आमिरच्या संपूर्ण कुटुंबाचा इतिहास जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचत राहा. या कुटुंबात खूप प्रसिद्ध प्रोड्युसर, दिग्दर्शक, स्क्रीनरायटर, अभिनेता ते सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. या परिवाराचे महान स्वतंत्र सेनानी स्वर्गीय मौलाना अबुल कलाम आझाद आणि माजी राष्ट्रपती झाकीर हुसैन यांच्याशी संबंध आहे.

बॉलीवूडमध्ये पहिले पाऊल या खान कुटुंबातील प्रसिद्ध प्रोड्युसर आणि डायरेक्टर नासिर हुसैन खान यांनी ठेवले जे आमिर यांचे वडील ताहीर हुसैन खानचे मोठे भाऊ आहेत. नासिर यांना लिहिण्याची आवड होती त्यामुळे त्यांचे नशिब वापरण्यासाठी ते मुंबईमध्ये आले. १९३८ मध्ये शेवटी त्यांनी चित्रपटासाठी लिहायला चालू केले. ‘अनारकली, मुनीमजी, पेइंग गेस्ट’ अशा काही चित्रपटांचे ते लेखक आहेत. ‘तुमसा नही देखा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केले. ‘दिल देके देखो, कारवाँ, यादों की बारात’ यांसारखे बरेच चित्रपट बनवले.

‘नासिर हुसैन फिल्म्स’ नावाचे प्रोडक्शन हाउस नासिर हुसैन यांनी चालू केले. यांच्या पत्नीचे नाव आयेशा हे आहे. मुलाचे नाव मनसुर खान तर मुलीचे नाव नुजहाद खान आहे. मनसुर हे सुद्धा बॉलीवूडचे प्रसिद्ध प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहेत. ‘कयामत से कयामत तक, जो जिता वही सिकंदर’ यांसारखे चित्रपट बनवले. यांचे लग्न टीना खान बरोबर झाले. यांनाही २ मुले आहेत. नुजहाद या चित्रपटांपासून दूर राहिल्या पण त्यांचा मुलगा म्हणजेच इम्रान खान हा एक अभिनेता म्हणून बॉलीवूड मध्ये काम करतो.

नासिर हुसैन यांचे लहान भाऊ ताहीर हुसैन खान. आमिर खान यांचा मुलगा आहे. मोठ्या भावाचे यश पाहून ताहीर सुद्धा बॉलीवूडमध्ये काम करू लागले. ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटापासून क्रू मेंबर म्हणून काम चालू केले. ‘अनामिका, हम है राही प्यार के, तुम मेरे हो जैसी’ यांसारखे चित्रपट प्रोड्युस केले. जीनद यांच्याबरोबर ताहीर यांनी लग्न केले आणि त्यांना आमिर, फैजल अशी दोन मुले आणि फरहाद आणि निगहाद अशा दोन मुली आहेत. फैजल यांनी चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले परंतु त्यात यश आले नाही.

निगहादने प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. आता आमिर च्या कुटुंबाबद्दल महियी घेऊयात. आमिर हे बारावी पर्यंत शिकले आहेत. बालकलाकार म्हणून ‘यादो की बारात’ मध्ये काम केले. प्रमुख अभिनेता म्हणून ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटापासून अभिनय चालू केला. आमिरच्या पहिल्या पत्नीचे नाव रीना दत्ता आहे. यानंतर २००२ ला यांचा घटस्फोट झाला. या दोघांना जुनैद मुलगा आणि इरा खान मुलगी आहे. २००५ मध्ये किरण राव बरोबर आमिरने लग्न केले. या दोघांना आजादराव खान हा मुलगा आहे. किरण सुद्धा एक प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहे. ‘लगान, मान्सून वेडींग, साथीया आणि स्वदेश’ सारखे चित्रपट बनवले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *