Home / कलाकार / काजोल आणि अजय देवगणचा होणार घटस्फोट

काजोल आणि अजय देवगणचा होणार घटस्फोट

बॉलीवूडमध्ये नवीन येणारे कलाकार तर चर्चेत असतात पण जर जुन्या कलाकारांबद्दल बोलायला गेलो तर तेही कोणापेक्षा कमी नाहीत. म्हणतात ना जुनं ते सोनं त्यामुळे जुन्या कलाकारांची गणना नवीन कलाकारांबरोबर काय करणार. जवळपास ३ दशकांपासून काजोल बॉलीवूडमध्ये काम करत आहे आणि तिच्याबरोबरच अजय देवगण सुद्धा बॉलीवूडमध्ये खूप पसंतीस पडले आहेत. अजय देवगण यांना सिंघम म्हणून सुद्धा ओळखले जाते. अजय आणि काजोल हे बॉलीवूडमधले सगळ्यात चांगल्या जोडीपैकी एक आहे.

परंतु जेव्हा अजय देवगण खूप प्रसिद्ध झाले आणि नंतर त्यांच्याबद्दल बऱ्याच अफवा पसरू लागल्या. त्या अनेक अफवांपैकी एक अशी अफवा होती की, त्या दोघांचा लवकरच घटस्फोट होणार आहे. यामागचे कारण काजोलचे सिनेसृष्टीतील काम किंवा अजयचे सिनेसृष्टीतील काम, काजोलचा हट्टीपणा किंवा  अजयचे मतभेद असू शकतात.  परंतु हे सत्य आहे की, काजोल आणि अजय हे दोघेही वेगळे होणार होते. नक्की यामागचे कारण काय होते? जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा.

अजय देवगणचा ज्या बॉलीवूड व्यक्तींबरोबर छत्तीसचा आकडा आहे, त्याच व्यक्ती काजोलच्या खूप जवळच्या व्यक्ती आहेत. भलेही हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत असतील, नेहमी एकमेकांना समजून घेत असतील, परंतु या दोघांच्या नात्यात थोडातरी दुरावा येत होता. काजोल ही अजयवर आणि फक्त अजयवरच प्रेम करते हे सर्वांना माहीत आहे. काही दिवसांपूर्वी ही बातमी खूप चर्चेत होती की, या दोघांचा घटस्फोट होणार आहे आणि असे पसरले होते की अजयचे प्रेमसंबंध बऱ्याच अभिनेत्रीबरोबर आहेत.

कुठे ना कुठे ही गोष्टही खरी आहे. जेव्हा सत्य समोर येते तेव्हा बॉलीवूड कलाकारांच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजयशी संबंधित आहेत. त्यातले एक सत्य म्हणजे अजयचे काजोलवर खूप प्रेम आहे. ९० च्या दशकातील नशेदार डोळे असणाऱ्या अजयवर बऱ्याच जणांचे मन आले. ज्यामध्ये रविना टंडन ही एक आहे. रविना आणि अजय या दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडी हिट होत होती. अजय आणि काजोलच्या लग्नामुळे रविनाला खूप दुःख झाले होते.

काजोल स्वतः म्हणायची मला दिवसभर खूप काम धावपळ असते आणि आयुष्यात काही कमी होती ती फक्त प्रेमाची होती. मला अजय मध्ये ते सर्व दिसले जे मला एक जोडीदाराच्या रुपात पाहिजे होते. त्यामुळे तिने लग्न केले. ‘रास्कल’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिने पाहिले की अजय आणि कंगना खूप जवळ येत आहेत. अशा अनेक अभिनेत्रीबद्दल काजोलने ऐकल्यामुळे कंटाळून वेगळे व्हायचा निर्णय घेतला होता. परंतु कुटुंबातील व्यक्तींनी समजवल्यानंतर काजोलचे मत बदलले आणि अजयला एक संधी दिली गेली ज्यात त्याने काजोलवरच त्याचे प्रेम आहे हे सिद्ध केले आणि आता ते सुखाने संसार करत आहेत.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.