मानसी नाईकचा नवरा पाहून दंग रहाल

‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ हे गाणे करणारी अभिनेत्री मानसी नाईक तिच्या खऱ्या आयुष्यात कोणाची वाट बघत होती? १९  जानेवारी २०२१ ला अभिनेत्री, डान्सर मानसी नाईकचा विवाहसोहळा अगदी धुमधडाक्यात साजरा झाला. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १० नोव्हेंबरला मानसीचा साखरपुडा झाला होता. मानसीचा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा. मानसीच्या जोडीदाराचे नाव प्रदीप खरेरा आहे. मानसी आणि प्रदीप या दोघांचेही प्रिवेडिंग फोटोशूटचे फोटो सुद्धा खूप व्हायरल झाले होते.

चाहत्यांनी त्या दोघांनाही शुभेच्छांचा वर्षाव केला. मेहेंदी, संगीत, हळद आणि नंतर लग्न असे सर्व कार्यक्रम अगदी मस्त पार पडले. या लग्नसोहळ्यात अभिनेत्री मानसी नाईक बरोबर तिची अगदी जवळची मैत्रीण अभिनेत्री दीपाली सय्यद सुद्धा होती. लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद घेतला गेला. मानसीने सुद्धा या सोहळ्यात नृत्य केले आहे. प्रदीप आणि मानसी दोघेही अतिशय सुंदर दिसत होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, मानसी आणि प्रदीप या दोघांचाही हा प्रेमविवाह आहे.

मानसीने तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधून सर्वांसमोर तिच्या या नात्याचा खुलासा केला. दोघेही लिव्हइन मध्ये राहत होते. चला पाहूया मानसीचा नवरा म्हणजेच प्रदीप खरेरा बद्दल अजून काही माहिती घेऊयात. प्रदीपचा जन्म हरियाणा येथे झाला आहे. तो एक प्रोफेशनल इंटरनॅशनल बॉक्सर आहे. ८ वी पासूनच त्याने बॉक्सिंगची तयारी चालू केली आणि  १० वीत तो इंटरनॅशनल बॉक्सिंग चॅम्पियन लिस्टमध्ये सामील झाला.

वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत त्याने विजय देखील मिळवला आहे. बॉक्सिंग बरोबरच प्रदीप मॉडेलिंग सुद्धा करतो. त्याचे स्वतःचे एक युट्युब चॅनेल देखील आहे त्यावर तो ट्रॅव्हल ब्लॉग आणि फूड ब्लॉगचे व्हिडिओ शेअर करत असतो. प्रदीप दिसायलाही खूप हँडसम आहे. मानसी आणि प्रदीप या दोघांचीही जोडी खूप सुंदर दिसते आणि या दोघांनाही लग्नाच्या खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी आपल्याकडून शुभकामना देऊया.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *