फुलपाखरू मधल्या लाडक्या वैदहीने पहा काय काय केले

झी मराठीवरील ‘फुलपाखरू’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली होती. मानस आणि वैदही या दोघांमधले प्रेम यावर आधारित ही मालिका होती. ही या प्रसिद्ध अशा जोडीचे नंतर लग्न होते आणि त्यांना एक मुलगीही होते ती म्हणजे माही. मालिकेतील सर्व पात्रे रसिकांना आवडू लागली होती. वैदही म्हणजे अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अभिनेता मानस म्हणजेच यशोमन आपटे यांच्या मुख्य भूमिकेतील ‘फुलपाखरू’ ही मालिका आहे. आज आपण येथे ऋता च्या खऱ्या आयुष्यातील माहिती घेणार आहोत.

ऋताचा जन्म १२ सप्टेंबर १९९४ ला मुंबईत झाला. ती एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तिचे शालेय शिक्षण मुंबईमधून झाले आहे. पदवीचे शिक्षण रामणारायन रुहिया कॉलेजमधून पूर्ण केले. कुटुंबातील एकही व्यक्ती अभिनय क्षेत्रात नसतानाही ऋताने एवढी प्रसिद्धी मिळवली आहे ती फक्त तिच्या चांगल्या अभिनयाच्या जोरावरच. ती कॉलेजमध्ये असताना विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत होती. त्यावेळी तिने बऱ्याच नाटकांमध्येही काम केले आणि तिची अभिनय क्षेत्रातील आवड वाढु लागली.

नंतर तिने आपण अभिनय क्षेत्रातच करिअर करणार असे ठरवले. २०१४ मध्ये ऋताला स्टार प्रवाहच्या ‘दुर्वा’ या मालिकेत प्रमुख भूमिका करायला मिळाली. या मालिकेत तिने अभिनेता हर्षद आतकारी बरोबर अभिनय केला आहे. या मालिकेने जवळपास १००० हुन जास्त एपिसोड पूर्ण केले होते.’दुर्वा, ही तिची पहिलीच मालिका आहे. ‘दुर्वा’ या मालिकेमुळे ऋताला ओळख मिळाली आणि तिला अजून संधी येऊ लागल्या. २०१७ मध्ये तिला ‘फुलपाखरू’ या मालिकेसाठी विचारण्यात आले आणि त्यात वैदेही ची भूमिका तिने साकार केली.

वैदेहीने सर्वांना त्यावेळी भुरळ पाडली होती. २०१९ च्या महाराष्ट्रातील ‘मोस्ट डिझायरेबाल वूमन’ च्या यादीत ऋता पहिल्या क्रमांकावर आहे. ‘दादा एक गुड न्युज आहे’ या नाटकातही तिने उमेश कामत बरोबर काम केले आहे आणि तिचा अभिनय अतिशय उत्तम होता. ‘अनन्या’ या चित्रपटात सुद्धा ती आपल्याला दिसणार आहे. ‘स्ट्राबेरी शेक’ मध्ये अभिनेता सुमित राघवन सोबत दिसली आहे आणि त्यात वडील मुलीच्या नात्याची गोष्ट दाखवली आहे. तिला नृत्याचीही खूप आवड आहे. अशी ही टीव्ही पडद्यावर आणि रंगमंचावरही झळकणारी ऋता तुमच्या मनाला भावते का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *