आई कुठे काय करते मधील अभिषेख आणि त्याचे खरे कुटुंब पहा

स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने बऱ्याच घरातल्या प्रेक्षकांचा ७.३० ते ८ वाजेच्या वेळ राखून ठेवला आहे. या मालिकेत आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी दर्शक उत्सुक असतात. सध्या संजना आणि अनिरुद्ध दोघेही एकत्र राहत आहेत परंतु दोघांचाही घटस्फोट झाला नाही. इकडे अरुंधती अनिरुद्धला घटस्फोट देण्यासाठी तयारी करत आहे. या दोघांनाही अभिषेक, यश आणि ईशा अशी तीन मुले आहेत. आपण आज येथे अभिषेकच्या जीवनाबद्दल माहिती घेणार आहोत.

अभिषेकला जेव्हा संजना आणि अनिरुद्ध यांच्याबद्दल समजले तेव्हा त्याच्या रागाने घरात बराच गोंधळ झाला. आपल्या आईला कधीही दुःख होऊ द्यायचं नाही हे त्याने ठरवले आहे. तर खऱ्या आयुष्यात अभिषेक कसा आहे हे आपण येथे पाहुयात. अभिषेकचे खरे नाव अभिनेता निरंजन कुलकर्णी आहे. निरंजनचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ ला झाला. निरंजनच्या वडिलांचे नाव विनोद कुलकर्णी तर आईचे नाव नीलम कुलकर्णी आहे. त्याला अजून दोन बहिणीसुद्धा आहेत.

इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स या नाशिकमधल्या कॉलेजमधून त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्याला लहानपणापासूनच अभिनय करायला आवडते. वयाच्या ९ व्या वर्षी त्यानं पहिल्यांदा कॅमेरा पाहिला असेल आणि तेव्हापासूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. ‘उंच माझा झोका’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून निरंजनने टीव्ही क्षेत्रात प्रवेश केला. या मालिकेत त्याने दामोदर अभ्यंकर  हे पात्र साकारले होते. २०१४ मध्ये झी मराठी वरील ‘जावई विकत घेणे आहे’ या मालिकेतही त्याने अभिनय केला आहे.

यात तो प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसला. ‘तू माझा सांगती’ यामध्ये ज्ञानेश्वर तर ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत त्याने श्री विष्णु या व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. झी युवावरील ‘तू अशी जवळी रहा’ ही मालिका त्याच्या करिअरसाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरली. या मालिकेत त्याने नितीश ही भूमिका साकारली होती. आता सध्या निरंजन स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तो अरुंधतीचा मोठा मुलगा म्हणजेच अभिषेकची भूमिका साकारत आहे. प्रेक्षकांना दिवसेंदिवस निरंजनची भूमिका जास्त पसंतीस येत आहे. तुम्हालाही याबद्दल काय वाटते आम्हाला कळवायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *