NMJOKE

जय जय स्वामी समर्थ मधील सम’र्थ पात्र करणारा कलाकार खऱ्याआयुष्यात

‘ये चांदुले, आता आमच्याच पासून सुरू झालेलं हे वर्तुळ शेवटी आमच्याच पाशी संपणार. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हा डायलॉग तुम्ही टीव्हीवर ऐकला असेलच. कलर्स मराठीवर २८ डिसेंबर पासून शनिवार ते सोमवार रात्री ९.३० वाजता एक नवी मालिका चालू झाली आहे ती म्हणजे ‘जय जय स्वामी समर्थ’. या मालिकेच्या प्रोमोनेच प्रेक्षकांना भक्तिमय केले आणि ही मालिका कधी प्रसारित होते याकडे प्रेक्षक पाहू लागले आणि त्यात आपल्याला काय काय स्वामी समर्थांच्या बद्दल माहिती मिळेल याचा विचार करू लागले.

या मालिकेत श्री स्वामी समर्थ यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल आपण येथे माहिती घेणार आहोत. श्री समर्थांची भूमिका अतिशय प्रसिद्ध अभिनेते अक्षय मुडावदकर यांनी साकारली आहे. त्यांचा जन्म ११ सप्टेंबरला झाला. याआधी अक्षय यांनी ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत अभिनय केला आहे. ‘गांधी हत्या आणि मी, द लास्ट व्हॉइसरॉय, इडीपस रेक्स’ यांसारख्या अनेक नाटकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत आणि त्यांसाठी अक्षयला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

सध्या ते ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत श्री समर्थांची भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील स्वामी समर्थांची छबी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. चांगल्या माणसांना ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ आणि दुष्ट व्यक्तींना चांगल्या वळणावर आणणाऱ्या श्री समर्थांच्या अशा बऱ्याच लीला आहेत. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी यांनी कोणत्या लोकांना कशी आणि कुठे कुठे मदत केली हे सगळे आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. एका मुलाखतीत अक्षय या मालिकेबद्दल म्हणतात की,

‘समर्थ ही भूमिका मी साकारतोय हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे पण त्याबरोबरच मला ही व्यक्तिरेखा साकारताना आनंदही तेवढाच मिळत आहे. माझे नशीब आहे आणि आशिर्वाद आहे त्यामुळे मला ही भूमिका करायला मिळाली आहे.’ या मालिकेला प्रसारित होऊ लागल्यापासून दर्शकांनी बरीच पसंती दिली आहे. तुम्हालाही ही नवीन चालू झालेली ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

Exit mobile version