मराठमोळ्या अलका कुबलची मुलगी काय करते पाहून तुम्ही थक्क व्हाल!

मुलगी जन्माला आली की एकेकाळी खूप ओझं आहे असं मानलं जायचं, त्यामुळे सगळ्यांना मुलगा हवा असायचा. पण आज काळ बदलला आहे. मुलगी ही आता मुलांबरोबरच नाही तर मुलांपेक्षाही जास्त पुढे जात आहेत. ज्या घरातील परिस्थिती बिकट आहे तिथे तर महिला घरातली कामे करून नोकरी करतात आणि घरखर्च भागवतात. आज मुली चंद्रापर्यंत पोहचल्या आहेत. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांत मुलींच्या आघाडीचे प्रमाण वाढत चालले आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच काय?

आता त्यांच्यापेक्षाही पुढे एक पाऊल टाकून विकास करत आहेत. अशीच एक मुलगी आहे जिच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. येथे ईशानी आठल्ये बद्दल बोलणार आहोत. ईशानी ही अलका कुबल- आठल्ये आणि समीर आठल्ये यांची मुलगी आहे. अलका कुबलला कोण नाही ओळखत. ती एक खूप सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण अभिनेत्रीची मुलगी एक वैमानिक बनते म्हणजे ही दुसऱ्यांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे. ईशानी मध्ये जिद्द होती की, आपण काहीतरी वेगळे करायचे त्यामुळे तिने अभिनयाचे क्षेत्र न निवडता वैमानिक बनायचे ठरवले.

लहानपणापासून ईशानीला विमानाच्या बाबतीत जाणून घेण्याची खूप आवड होती. या आवडीनेच तिला तिच्या पुढच्या येणाऱ्या भवितव्यासाठी शिक्षण घेण्यास प्रेरणा दिली. तिने वैमानिक होण्यासाठी बरेच कष्ट केले, खूप अभ्यास केला आणि या तिच्या कष्टाचे तिला चांगले फळही मिळाले. तिला व्यावसायिक विमान चालवण्यासाठी लायसेन्स भेटले आहे म्हणजे आता ती व्यावसायिक विमानाची पायलट म्हणून विमान चालवू शकते.

या क्षेत्रात तिने बरीच उंच भरारी घेतली आहे. घरात अभिनयाचे एवढे चांगले वातावरण असताना एखादे दुसरे क्षेत्र निवडणे म्हणजे कौतुकास्पद आहे. ईशानी ही त्यांची थोरली मुलगी तर कस्तुरी ही धाकटी मुलगी आहे. ईशानीचे दिल्लीच्या निशांत वालिया बरोबर लग्न झाले आहे आणि कस्तुरी ही परदेशात डरमॅटोलॉजिस्टचे शिक्षण घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *