अशी ही बनवाबनवी मधील शांतनू ची बायको पाहून पागल व्हाल

तुमच्यासाठी आज आम्ही अशा एका कलाकाराबद्दल माहिती घेऊन आलो आहोत जो एका खूपच गाजलेल्या मराठी चित्रपटातील कलाकार आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट तर तुम्ही पाहिलाच असेल. यातील शांतनू बद्दल आपण येथे माहिती घेऊयात. शांतनूने त्या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांच्याबरोबर अभिनय केला आहे. शांतनूचे खरे नाव अभिनेता सिद्धार्थ राय आहे. तया सुशांत राय म्हणून सुद्धा ओळखले जाते.

सिद्धार्थने बऱ्याच मराठी, हिंदी आणि साऊथ चित्रपटात काम केले आहे. त्याचा जन्म १९ जुलै १९६३ ला मुंबई मध्ये झाला. सिद्धार्थ व्ही शांताराम यांचानातू आहे. त्याच्या आईचे नाव चारुशीला राय आहे जी व्ही शांताराम यांची मुलगी आहे. १९९९ मध्ये सिद्धार्थने तेलगू अभिनेत्री शांतिप्रिया जी प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रियाची बहीण आहे तिच्याबरोबर लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. अचानकच २००४ मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाले तेव्हा तो ४० वर्षांचा होता.

त्यावेळी त्याची मुले चार वर्षांपेक्षा सुद्धा लहान होती. बालकलाकार म्हणून सिद्धार्थने ‘चानी’ या चित्रपटात काम केले होते. नंतर १९८० मध्ये ‘थोडीसी बेवफाई’ मध्ये अभिनय केला. त्याला ‘वंश’ या चित्रपटापासून खूप ओळख मिळू लागली. त्यानंतर त्याने ‘परवाने, बाजीगर, पहचान, गंगा का वचन’ अशा अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. मराठी मधला त्याचा अतिशय प्रसिद्ध चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’ आहे.

त्यामध्ये  सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करायला मिळाले. ‘चरस : ए जॉईंट ऑपरेशन’ हा त्याचा २००४ मध्ये रिलीज झालेला शेवटचा चित्रपट होता. सिद्धार्थने १९९२ ते २००२ मध्ये जेवढे काही चित्रपट केले त्यामुळे तो बराच प्रसिद्ध झाला. त्याचा अभिनय अतिशय उत्तम होता त्यामुळे त्याला बऱ्याच चांगल्या कलाकारांबरोबर अभिनय करायला भेटला. तुम्हालाही सिद्धार्थचा अभिनय कसा वाटत होता हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *