NMJOKE

जरीन खानच्या बहिणी ला पाहून वेडे व्हाल

सुप्रसिद्ध अभिनेत्री जरीन खानचा जन्म १४ मे १९८७ ला मुंबई मध्ये झाला. हिंदी इंग्रजी उर्दू आणि मराठी या भाषा खूप चांगल्या प्रकारे समजते आणि बोलते. तिने मुंबईच्या रिझवीन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. जरीनला डॉक्टर बनायचे होते परंतु परिस्थिती अनुकूल नसल्याने त्यांना शिक्षण सोडून द्यावे लागले. तिच्या वडिलांनी त्यांच्यासोबत राहणार नाही असे सांगितल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. घरात कोणी मुलगा किंवा पुरुष नव्हता जो पूर्ण घराला सांभाळू शकेल.

जरीन, तिची आई आणि लहान बहीण या तिघी नंतर एकत्र राहू लागल्या. घरातील मोठी या नात्याने घराचे ओझे जरीनच्या खांद्यावर आले. तिने फक्त १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. पैसे मिळवण्यासाठी तिने भेटेल ती नोकरी केली आहे परंतु वाईट असे काही काम केले नाही. कॉल सेंटर मध्ये नोकरी केली आहे. ६५० रुपये रोजचे भेटणार अशा ठिकाणीही काम केले आहे. तिने एअर होस्टेस साठी १०० किलो वरून ५८ किलो वजन केले. तिने मॉडेलिंग सुद्धा केले आहे.

एकदा एका सेटवर तिची आणि सलमान खान यांची ओळख झाली. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत काम करायचे ठरवले. तिने सलमान खान बरोबर ‘वीर’ या चित्रपटात काम केले. बऱ्याच जणांनी सुरुवातीला असे सांगितले की, जरीन खान आणि कतरीना कैफ दोघी जवळपास सारख्याच दिसतात. पण तुम्ही निरखून पाहाल तर दोघींमध्ये बराच फरक आहे. ‘वीर’ चित्रपटातील राजकुमारीच्या भूमिकेसाठी तिला अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. आयटम सॉंग ‘कॅरॅक्टर ढिला है’ यामध्येही ती सलमान खान बरोबर दिसली आहे.

‘हेट स्टोरी ३, अक्सर २, हाऊसफुल २’ यांसारख्या चित्रपटांमुळे जरीन खान खूप चर्चेत आली होती. हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटही तिने काम केले आहे. याच जरीन खानच्या बहिणीबद्दल आपण येथे थोडी माहिती जाणून घेणार आहोत. जरीन खानच्या बहिणीचे नाव सना खान आहे. तीही जरीन सारखीच खूप सुंदर दिसते. शाळेत असताना सनाच्या खूप तक्रारी घरापर्यंत येत होत्या. पण ती स्वभावाने खूप चांगली आहे. जरीन आणि सना नेहमी एकमेकींबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. या दोघींमध्ये खूप प्रेम आहे. सध्या जरीन, तिची आई आणि सना मुंबईमध्ये राहत आहेत.

Exit mobile version