या रशियन अनोख्या पद्धतीने प्रसिद्ध मॉडेलने हिंदू धर्मात प्रवेश केला

या जगात बऱ्याच आगळ्यावेगळ्या गोष्टी घडत असतात. अशाच विचित्र गोष्टींमुळेच वर्ल्ड रेकॉर्ड पण बनते. काही जण वजन जास्त असल्याने रेकॉर्ड बनवतात तर काही केस सर्वांत मोठे असल्यामुळे. आज आपण येथे अशाच एका वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेल्या व्यक्तीबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्ही या जगातल्या सर्वांत उंच पाय असलेल्या मुलीला पाहिले आहे का? जर अजूनही नसेल पाहिले तर इथे तुम्हाला तिच्याबद्दल माहिती भेटेल. चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वांत उंच पाय असणाऱ्या एकटेरिना लिसीना बद्दल.

रुसची राहणारी एकटेरिना लिसीनाने जगात सर्वांत उंच पाय असल्याचे रेकॉर्ड बनवले आहे. एकटेरिनाने गिनीज वर्ल्ड बुक मध्ये दोन रेकॉर्ड बनवले आहेत. २९ वर्षांची एकटेरिना लिसीना ही एक मॉडेल आहे आणि तिची उंची ६ फूट ९ इंच आहे. तिला जगातील सर्वांत उंच मॉडेल असण्याचाही पुरस्कार मिळाला आहे आणि ती नोंद गिनीज वर्ल्ड बुक मध्ये झाली आहे. ही मुलगी एवढी उंच कशी आहे यामागे काही कारण आहे का? होय, एकटेरिना लिसीनाच्या घरी सर्व जण उंच आहेत आणि त्यामुळे एकटेरिनासुद्धा उंच आहे.

तिच्या भावाची उंची ६ फूट ६ इंच, वडीलांची ६ फूट ५ इंच, तर आईची उंची ६ फूट १ इंच आहे. उंच असल्यामुळे तिचे गिनीज वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड तर झाले पण तिला तिच्या रोजच्या जीवनात बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागते. तिला कोणाच्या घरातही जाताना अडचण येते, तसेच तिला विमान किंवा कारमध्ये बसताना अडचणी येतात. कपडे आणि चप्पल सुद्धा तिला दुकानातुन घेता येत नाहीत, तिला ते वेगळी ऑर्डर देऊन बनवून घ्यावे लागतात. मॉडेलिंग करण्याआधी ती बास्केटबॉल खेळत होती.

तिने रुसच्या राष्ट्रीय बास्केटबॉल टीममध्ये खेळून २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवले होते. एकटेरिना बद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती जरी रुसची राहणारी असली तरी ती हिंदू धर्माचे पालन करते. तुम्ही बरोबर वाचलेत. काही वर्षांपूर्वी एकटेरिना लिसीनाने हिंदू धर्मात परिवर्तन केले. ती महालक्ष्मीची परमभक्त आहे आणि तिला मांसाहार करायला आवडत नाही. महालक्ष्मीची ती भक्तिभावाने रोज पूजा करते. एका दुसऱ्या देशातील आणि दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीने आपल्या देशातील हिंदू धर्माचे पालन करणे ही खरंच गर्वाची गोष्ट आहे. तुम्हालाही या गोष्टीबद्दल काय वाटते, आम्हाला नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *