पाठकबाई आता टीव्हीवर दिसणार नाही

बऱ्याच मालिका येतात जातात आणि प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतात. सर्व घरातील प्रेक्षकांचा संध्याकाळचा वेळ हा मालिका पाहण्यातच जातो यात खासकरून महिलांचा समावेश आहे. अशाच काही मालिकांपैकी ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता काही दिवसांतच प्रेक्षकांना निरोप देणार आहे. ही मालिका कधी संपणार? मालिकेचा शेवट काय होईल? यानंतर कोणती मालिका आपल्याला या वेळी पाहायला मिळणार? या सगळ्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा.

या मालिकेतील राणादा आणि अंजली यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका जवळपास चार वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या या मालिकेत नंदिताचे नाटक चालले आहे की, तिच्या अंगात भुत शिरलं आहे जे दुबईच्या राणीचे आहे. ते भूत गावच भलं करणार आहे, अशी खोटी गोष्ट तिने गावभर पसरवली आहे. गावकऱ्यांमध्येही असे बोलणे चालले आहे की, खरच नंदिताच्या तस अंगात येत आहे आणि ती गावाला नीट करणार आहे.

जिजाला तर सगळं माहितेय की, नंदिता नाटक करत आहे पण इकडे राणाला याबद्दल माहिती नसते. जिजा त्याला समजवते पण राणाला हेच वाटत असते की तिच्या अंगात खरच भूत आले आहे. जिजा नंदिताला धडा शिकण्यासाठी पूर्ण तयारीत आहे आणि धडा शिकवल्यावरच या मालिकेचा शेवट होणार आहे. राणाचे या मालिकेत काय होते ते आपल्याला मालिका पाहूनच समजेल. ही मालिका आता लवकरच बंद होणार आहे, असे अभिनेत्री धनश्री कडगावकर हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सांगितले आहे.

‘तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होत आहे. चार वर्षे आणि १२५० हुन अधिक भागांनंतर आता थांबायची वेळ आली आहे. ह्या मालिकेशी संबंधित प्रत्येकाला या मालिकेने खूप काही दिले आहे. प्रत्येकासाठी ही मालिका स्पेशल आहे’, असेही तिने पोस्ट करताना सांगितले आहे. या मालिकेच्या नंतर आपल्याला नवीन मालिका बघायला मिळणार आहे जिचे नाव ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आहे. ही मालिका आता कशी असेल? प्रेक्षकांचे मनोरंजन किती करते? हे आपल्याला येत्या काळातच समजेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *