मुलीने नाव कमवावे हे बापाचे स्वप्न परंतु मुलगी लहानपणीच निधन पावली. निरम्याच्या निर्मितीमागचे खरे कारण वाचून रडू आवरणार नाही

९० च्या दशकात आपल्या मनोरंजनासाठी काही मोजकेच चॅनेल होते. काही ठराविक कार्यक्रम आणि जाहिराती पाहून लोक आनंदीत होते. त्यावेळची टेक्नॉलॉजी ही वेगळीच होती. त्या जाहिराती अतिशय उत्तम होत्या. त्यातलीच एक खूप प्रसिद्ध झालेली निरमा पावडरची जाहिरात आहे. निरमा वॉशिंग पावडरचे जिंगल म्हणजेच ते जाहिरातीचे गाणे अजूनही प्रेक्षकांच्या ओठांवर असते. त्याकाळी धुण्याची पावडर म्हणजे निरमा असा समज करून घेतला होता. त्यावेळी निरमा हे ब्रँड खूप प्रसिद्ध झाले.

आजही आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आणि आपणही त्या जाहिरातीचे बोल पुटपुटत असतो. निरमा पावडरच्या पुड्यावर एक फ्रॉक घातलेली मुलगी  तुम्ही पाहिली असेल. तुम्हाला माहीत आहे का ती मुलगी कोण आहे? आता ती मुलगी कुठे असते आणि काय करते? अडचणींना सामोरे जात एक फेरीवाला एवढा मोठा उद्योजक कसा झाला? चला जाणून घेऊया अशाच काही प्रश्नांची उत्तरे. १९६९ मध्ये गुजरातच्या कर्सन भाई यांनी निरमा पावडर बनवायचे चालू केले.

यांनाच एक मुलगीही होती जिच्यावर त्यांचे जवळपास प्रेम होते. तिचे नाव निरुपमा होते. कर्सनभाई तिला लाडाने निरमा म्हणून हाक मारत असे. आपल्या काळजाच्या तुकड्याला कधीही लांब न जाऊ देणाऱ्या वडिलांपासून ही लाडकी मुलगी कायमची या जगातून गेली. निरुपमाचे एका अपघातात निधन झाले. शेवटी जे नशिबात असते तेच घडते. या धक्क्यातून सावरायला कर्सनभाईंना वेळ लागला. त्यांची इच्छा होती की, निरमाने मोठे होऊन खूप नाव कमवावे पण ते नाही होऊ शकले.

त्यामुळे त्यांनी निरमाचे नाव नेहमी ओठांवर असावे आणि अमर व्हावे यासाठी निरमा वॉशिंग पावडरची निर्मिती केली. त्या पुड्यावर त्यांनी निरमाचा फोटो लावला. पण शेवटी काम म्हणले की अडचणी येणारच. त्यावेळी सर्फ ची पावडर पण खूप प्रसिद्ध होती. सर्फ एक किलो पावडर १५ रुपये तर निरमा एक किलो पावडर ३.५० रुपये ला विकत होते. ज्या लोकांना सर्फ परवडत नव्हते म्हणजेच ज्या लोकांची परिस्थिती वाईट होती त्यांना निरमा पावडरचा फायदा होऊ लागला.

दिवसेंदिवस निरमा जास्त विकला जाऊ लागला. दुकानदारांची उधारी सुद्धा वाढू लागली आणि परिणामी तोटा सुद्धा वाढला. कर्सनभाई त्यावेळी सरकारी नोकरी करत होते आणि सायकलवर जाता जाता ते निरमा पावडरचे पुडे विकत असे. तीन वर्षांच्या कष्टानंतर निरमाचा फॉर्म्युला त्यांनी बनवला. बनवणे आणि विकणे ही दोन्ही कामे कर्सनभाई स्वतः करत होते. काही दिवसांनी त्यांनी सरकारी नोकरी सुद्धा सोडली. हळूहळू लोकांना कामाला ठेवले आणि निरमाचे उत्पादन वाढवले.

बऱ्याच अडचणींचा सामना करत निरमाने नाव कमावले आणि तो घरोघरी पोहचला. एके दिवशी कर्सन भाईंनी सर्व निरमा पुडे मार्केटमधून परत मागवले तेव्हा सगळ्यांना वाटले की, त्यांनी हार मानली आणि आता निरमा बंद होणार. पण त्यांच्या डोक्यात वेगळेच चालले होते. त्यांनी निरमाची जाहिरात करायचे ठरवले. जेव्हा ही जाहिरात टीव्हीवर प्रसारित केली  तेव्हा निरमा खूप प्रसिद्ध झाला आणि निरमाची मागणी वाढू लागली. जो माल आधी उधारीवर जात होता तो आता रोख जाऊ लागला आणि नफा होऊ लागला. अशा प्रकारे निरमा खूप प्रसिद्ध झाला. ही आहे यशस्वी निरमा पावडर ब्रँडची कहाणी.

‘निरमाचे गाणे : वॉशिंग पावडर निरमा वॉशिंग पावडर निरमा…दूध से सफेदी निरमा से आए…रंगीत कपडा भी खिल खिल जाए…वॉशिंग पावडर निरमा.’

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *