मीरा म्हणजेच सायली सध्या काय करत आहे पहा

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. बऱ्याच अभिनेता अभिनेत्रींनी लग्न केले आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिचे नुकतेच लग्न झाले आहे आणि शिवाय ती एक प्रसिद्ध अभिनेत्री सुद्धा आहे. ही अभिनेत्री ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेतील प्रमुख पात्र साकारत होती. या मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्या प्रमुख पात्राचे नाव आहे अभिनेत्री सायली देवधर.

सायलीला लहानपणापासून अभिनयाची खूप आवड आहे आणि तिने खूप कष्ट करून नाव कमावले आहे. सायलीने ‘लेक माझी लाडकी, जुळून येति रेशीमगाठी, नवरी मिळे नवऱ्याला’ यांसारख्या बऱ्याच मालिकांमध्ये अभिनय केला आहे. तिचा अभिनय हा अतिशय सुंदर आहे ते आपल्याला तिने केलेल्या मालिकांमधून दिसला असेलच. सायलीने १४ फेब्रुवारी २०२० ला पुण्यात धुमधडाक्यात लग्न केले.

तिच्या नवऱ्याचे नाव गौरव बुरसे असे आहे. गौरव हा एक चांगला संगीतकार आणि गायक आहे. दोघांचा जोडा अगदी शोभून दिसतो. “काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सायली देवधर लग्नाच्या बंधनात अडकली आहे. सायलीचा लग्नातील फोटो अभिनेत्री प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यानंतर सायलीने आता स्वत: लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.  सायली देवधर हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीवरील लोकप्रिय चेहरा आहे.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *