Home / कलाकार / लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चहल च्या बायकोचा व्ही डिओ वाय रल

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चहल च्या बायकोचा व्ही डिओ वाय रल

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल नुकताच विवाह बंधनात अडकला. त्याने युट्युबर, कोरीओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी लग्न केलं आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. या दोघांच्या जोडीची चर्चा खुप दिवसांपासून रंगली होती. चहलची पत्नी धनश्री ही अतिशय सुंदर डान्स करते. आणि तिची स्वताची एक डान्स एकॅडमीसुद्धा आहे.

तुम्हाला वाचुन आश्चर्य वाटेल धनश्री ही एक डॉक्टरसुद्धा आहे. तिचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ती या व्हिडिओमध्ये दारू बदनाम या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ चहलचे आणि तिचे लग्न झाल्यानंतर व्हायरल झाला आहे. तसे बघायचे झाले तर हा व्हिडीओ जुनाच आहे पण तो आता व्हायरल झाला आहे.

धनश्रीबद्द्ल बोलायचे झाले तर धनश्री टीकटॉकवरसुद्धा सक्रीय होती. भारतीय क्रिकेटपटुची म्हणजे चहलची पत्नी होणार हे लोकांना समजल्यानंतर तिची लोकप्रियता खुप वाढली. यानंतर सोशल मिडियावर तिचे फॉलोवर्स कित्येक पटीने वाढले आहेत. यानंतर तिने आपले व्हिडिओ युट्यूबवर टाकले. तिच्या डान्सच्या व्हिडिओनंतर तिला युट्यूबवरूनही खुप पसंती मिळाली.

तिचे युट्यूबवर २० लाख सब्सक्रायबर्स आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ७३ लाख लोकांनी पाहिले आहे. इन्स्टाग्रामवर धनश्रीचे २५ लाख फॉलोवर्स आहेत. आयपीएल सुरू असतानासुद्धा धनश्री चहलला पाठिंबा देण्यासाठी दुबईला गेली होती.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.