Home / कलाकार / चित्रपटातील साधीभोळी लक्ष्मी पहा किती सुंदर आहे

चित्रपटातील साधीभोळी लक्ष्मी पहा किती सुंदर आहे

टीव्ही हा प्रत्येकाच्या घरातील अविभाज्य घटक बनला आहे. टीव्ही म्हणलं की त्यावर बऱ्याच मालिका, चित्रपट, नाटके आणि बरंच काही येत आणि हे सर्व आपल्या आवडत्या कलाकारांशिवाय शक्य नाही. आज आपण इथे एक अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिचे नाव आहे सई लोकुर. सईला तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिले असेल.

खूपच कमी लोकांना माहीत आहे की तिने बालकलाकार म्हणून सुद्धा लहानपणी चित्रपटात अभिनय केला आहे. सईचा जन्म कर्नाटकातील बेळगाव येथे ५ सप्टेंबर १९८९ ला झाला. सध्या सई मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. तिचे सर्व शिक्षण मुंबईमधून पूर्ण झाले आहे. सईकडे बीकॉम ची पदवी आहे. ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’ हा तिचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट आहे.

त्यानंतर तिने बरेच मराठी आणि हिंदी चित्रपट केले. ‘किस किसको प्यार करू’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता ज्यात तिने कपील शर्माबरोबर काम केले. सईने ‘प्लॅटफॉर्म, नो एन्ट्री पुढे धोका आहे, आम्हीच तुमचे बाजीराव, पारंबी’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. सईने २०१८ साली ‘बिग बॉस सीजन १’ मध्ये सुद्धा सहभाग घेतला होता, ज्यात ती रनरउप विजेती आहे.

नुकतेच ३० नोव्हेंबर २०२० ला बेळगाव मध्ये सईचे तिच्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न झाले आहे. तिच्या नवऱ्याचे नाव तीर्थदीप आहे. लाडाने सई त्याला दीप म्हणून हाक मारते. त्यांच्या लग्नसोहळ्याच्या बऱ्याच कार्यक्रमांचे फोटो तुम्ही पाहिले असतील. दोघांचा जोडा अगदी साजेसा आहे. दीप हा ३३ तर सई ही ३१ वर्षांची आहे. अमेझॉन या चांगल्या कंपनीमध्ये दीप नोकरी करतो. त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. दीप आणि सिनेसृष्टी या दोघांचा लांबवर कोणताच संबंध नाही. दीप हा मूळचा कोलकत्ताचा असल्याने त्याला मराठी नाही येत परंतु तो सध्या मराठी शिकत आहे.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.