७ वर्षांनी मोठ्या असलेल्या नेहा सोबत रोहन प्रीतला लग्न नव्हते करायचे

बॉलिवूडमधील टॉप गायक नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांची खरी प्रेम कहाणी माहिती आहे का? चला तर मग आपण जाणून घेऊयात या खास जोडी विषयी काही गोष्टी…! तुमचा विश्वास बसणार नाही पण नेहा रोहनप्रीत पेक्षा ७ वर्षांनी मोठी आहे. रोहनप्रीत फक्त २५ वर्षाचा आहे तर नेहा ३२ वर्षांची आहे.

काही दिवसांपूर्वीच नेहा कक्करने कपिल शर्मा शोमध्ये याबाबत खुलासा केला असून रोहनप्रीत लग्न करण्यास तयार नसल्याचे सांगितले आहे. याबाबत सांगताना नेहा म्हणतीये, शूट संपल्यानंतर रोहनने तिचा स्नॅपचॅट आयडी देखील मागितला होता. पण मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर झाला.

‘रोहनप्रीत वयाच्या २५ व्या वर्षी लग्न करण्यास तयार नव्हता. एक दिवस आला जेव्हा रोहनने स्वत: च्या वतीने नेहाला सांगितले की तो तिच्याशिवाय जगू शकत नाही. यानंतर दोघांनीही लग्न गाठ बांधली. नेहा म्हणते रोहनप्रीत एक हँडसम असून खूपच चांगल व्यक्ती आहे.

दरम्यान, नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी नुकतेच लग्न केले आहे. सोशल मीडियावर नेहमीच नेहा आणि रोहनप्रीत अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यांचे लग्नाचे अनेक फोटो तुफान व्हायरल देखील झाले होते. याचबरोबर त्यांचा हनीमूनची देखील चांगलीच चर्चा झाली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *