भिंगरी खऱ्या आयुष्यात कशी दिसते पहा

बऱ्याच नवीन मालिका येतात आणि त्याबरोबरच नवीन कलाकारही. स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतही आपण पाहिले असेल की बरेच नवीन चेहरे आहेत जे उत्तम अभिनय करत आहेत. याच मालिकेतील एक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आपण इथे बोलणार आहोत. मालिकेतील भिंगरी हे पात्र तुम्ही पाहिले असेल. भिंगरी ही अतिशय चुलबुली आणि खोडकर दाखवली आहे.

पण ती घरातली सर्व कामे चोखपणे करते. तिचे मन खूप स्वच्छ आहे आणि ती सगळ्यांची लाडकी सुद्धा आहे. चला तर मग जाणून घेऊयात भिंगरीची खऱ्या आयुष्यातील थोडक्यात माहिती. निकिता पाटील हे भिंगरीचे खरे नाव आहे. निकिता ही जळगाव मधली आहे. तिच्या गावात ती पहिलीच मुलगी आहे जी अभिनेत्री बनली आहे. तिने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकमुनिकेशनची अभियांत्रिकी पदवी मिळवली आहे.

शिक्षण घेत असतानाच तिने अनेक नाटकेही केली. या कोरोना काळात तिने बऱ्याच ऑडिशन्स सुद्धा दिल्या कारण तिला अभिनय क्षेत्रातच काम करायचे होते. दोन वर्षांपासून ती तिच्या चांगल्या आणि अभिनय क्षेत्रातील भवितव्यासाठी कष्ट घेत होती. शेवटी तिला ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत अभिनय करण्याची संधी मिळाली. लोकांना आता ती पसंत येत आहे आणि तिचा अभिनय सुद्धा लोकांना चांगला वाटत आहे.

तिच्या बहिणीचे नाव परी पाटील आहे. तिनेही युट्युबवर तिचा एक चॅनेल बनवला आहे. त्यावर ती ऍक्टिव्ह असते. जेव्हा निकिता अभिनेत्री बनल्यानंतर पहिल्यांदा घरी आली तेव्हा तिचे ढोलताशांच्या गजरात स्वागत केले आणि बऱ्याच लोकांची उपस्थिती तेथे होती. एवढं प्रेम जनतेकडून मिळणे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *