NMJOKE

फुलाला सुगंध मातीचा कार्यक्रमातील जान्हवी पहा

थोड्याच कालावधीत प्रसिद्ध झालेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेची तुम्हाला माहिती असेलच. या मालिकेत जिजीआक्का हीच पूर्ण घराची प्रमुख आहे जी घरातले सर्व निर्णय एकटी घेते. सध्या या मालिकेत तिची सून म्हणजेच कीर्ती जास्त शिकली आहे हे समजले आहे. मग आता यापुढे या मालिकेत काय होते हे जाणून घेण्यासाठी सगळेजणच उत्सुक आहेत.

याच मालिकेतील एका पात्राबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत ते म्हणजे जान्हवी. जान्हवी ही जिजीआक्काची मुलगी आहे. जान्हवीचे खरे नाव अभिनेत्री भूमिजा अरविंद पाटील आहे. तिचा जन्म २१ नोव्हेंबर १९९८ ला मुंबईमध्ये झाला. भूमिजाला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करायला आवडते. अभिनयाबरोबरच तिला नृत्याची सुद्धा आवड आहे.

‘नटसम्राट’ हे तिने केलेले पहिले नाटक आहे आणि यापासूनच तिच्या अभिनयाला सुरुवात झाली. ‘झुलता झुलता झुलतंय की, एक होती राजकन्या’ यांसारख्या मालिकांमध्येही तिने उत्तम अभिनय केला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर हे ठिकाण आणि नॉनव्हेज हे भूमिजाला खूप प्रिय आहेत. भूमिजा सध्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ यामध्ये जान्हवीची भूमिका साकारत आहेत. तुम्हालाही भूमिजाचा हा अभिनय कसा वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा.

Exit mobile version