सोनाली पहा किती सुंदर दिसते

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही स्टार प्रवाहवरील मालिका दर्शकांच्या बरीच पसंतीस पडत आहे. यातील सर्वच पात्रे भूमिका अत्यंत उत्तम पद्धतीने साकारत आहेत. ही मालिका एका घराची आहे, जिथे शिक्षणाचे काहीच महत्त्व नाही. कीर्ती म्हणजेच जिजिआक्काची सून ही जरी शिकलेली असली तरी ती घरात नाही सांगू शकत की ती एवढी शिकली आहे.

मुळात जिजीआक्काला शिकलेली सुनच नको होती. त्यामुळे घरात कोणच जास्त शिकलेले नाहीत. जिजीआक्काची दुसरी सून म्हणजेच सोनाली जी घरातली मोठी सून आहे. सोनालीला तुम्ही पाहिलेच असेल की ती किती वेंधळ्यासारखी करते. तिची भूमिका ती खूप चांगल्या पद्धतीने करत आहे. तीही जास्त शिकलेली नाही.

तुम्हाला मालिकेतील सोनालीबद्दल माहिती असेलच पण आज आपण इथे तिच्या खऱ्या आयुष्यातील माहिती घेऊया. सोनालीचे खरे नाव अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आहे. तिचा जन्म १५ ऑगस्ट २००० ला झाला आहे. सध्या ती ठाण्यात वास्तव्यास आहे. तिने बिर्ला स्कूल आणि डीएव्ही पब्लिक स्कूल येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

पोतदार कॉलेजमधून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. २०१७ मध्ये ‘जे आहे ते आहे’ या नाटकात काम केले होते. कलर्स मराठीवरील ‘घाडगे आणि सून’ या मालिकेपासून टीव्ही अभिनय करायचे चालू केले. २०१९ मध्ये ‘अलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत ती काम करते. या मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे.

या मालिकेने ३०० हुन अधिक भाग पूर्ण केले आहेत. यात ती रिचा ची व्यक्तिरेखा साकारत आहे. याच वर्षी चालू झालेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत ती मोठ्या सुनेची भूमिका साकारत आहे. तुम्हालाही ऐश्वर्याची भूमिका कशी वाटते हे कमेन्ट मध्ये नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *