बॉबी देओल च्या दोन्ही बहिणी आहेत या

चित्रपट ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ यातून १९६० ला बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते अभिनेते म्हणजे धर्मेंद्र. त्यांना आता या चित्रपट जगतात येऊन ६० वर्षे झाली आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांच्या तीन पिढ्या चित्रपटात आल्या आहेत. धर्मेंद्रच्या दोन्ही मुलांना म्हणजेच सनी आणि बॉबी देओल यांना सगळे ओळखतात पण त्यांच्या दोन बहिणी अजिता आणि विजेता यांच्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी बॉबीने मोठी बहीण अजिताबरोबरचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता ज्यामध्ये भाऊ आणि बहिणीचे सुंदर नाते दिसून येते. बॉबी हे काही दिवसांपूर्वी अमेरिकेला गेले तेव्हा तिथे त्यांच्या बहिणीला भेटले. धर्मेंद्रची २ लग्ने झाली आहेत. पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर तर दुसरीच हेमा मालिनी. धर्मेंद्रच्या ४ मुली आहेत. हेमा मालिनीच्या ईशा आणि अहाना या दोन मुली लाईमलाईट मध्ये असतात.

 

परंतु अजिता आणि विजेता या नेहमी लाईमलाईट पासून दूर आहेत. हेच नाहीतर त्या दोघींना कधी कुठल्या कार्यक्रमात सुद्धा कोणी पाहिले नाही. मीडियाच्या रिपोर्ट्स नुसार आता त्या दोन्ही बहिणी कॅलिफोर्निया येथे राहतात. अजिताचे लग्न किरण चौधरी बरोबर झाले. किरण हे ‘1000 Decorative Designs from India’ नावाच्या पुस्तकाचे लेखक आहेत. धर्मेंद्रने त्याची दुसरी मुलगी विजेताच्या नावाने प्रोडक्शन उघडले आहे.

त्याच्या कंपनीचे नाव ‘विजेता प्रोडक्‍शन प्राइवेट लिमिटेड’ आहे. धर्मेंद्रने प्रकाश कौरबरोबर १९५४ मध्ये लग्न केले होते. या दोघांचे ४ मुले म्हणजे सनी, बॉबी, विजेता आणि अजिता आहेत. यानंतर धर्मेंद्रने स्वतःचा धर्म बदलून २ मे १९८० मध्ये हेमा मालिनीबरोबर लग्न केले. हेमा आणि धर्मेंद्र यांच्या २ मुली आहेत त्या म्हणजे ईशा आणि अहाना. धर्मेंद्रचे ४ नातू म्हणजे करण, राजवीर, आर्यमान आणि धरम हे आहेत. असे त्यांचे मोठे कुटुंब आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *