Home / कलाकार / रंग माझा वेगळा कार्यक्रमातली दीपा पाहून वाह वाह कराल

रंग माझा वेगळा कार्यक्रमातली दीपा पाहून वाह वाह कराल

सुंदर दिसणंही स्वाभाविकच प्रत्येकाची भावना आहे. या भावनेतूनच सौंदर्याची भावना गोऱ्या रंगांशी केली जाते. त्यामुळे सावळ्या रंगाकडे तितक्याच प्रकर्शाने दुर्लक्ष झालं आहे. बाळही गोरं हवं आणि बायकोही गोरीचं हवी असा आग्रह अनकेदा केला जातो. पण, आंतरिक सौंदर्य हे कधीही महत्त्वाचं आहे हेच एका मराठी मालिकेतून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

स्टार प्रवाहवर वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेतील दीपा खऱ्या आयुष्यात कशी दिसते हे तुम्हाला माहित आहे का ? या मालिकेतील नायिका म्हणजेच दिपाच्या भूमिकेत वेगळेपणा आहे. स्वत:वर भरभरुन प्रेम करणारी दिपा तिच्या गुणविशेषांमुळे प्रेक्षकांना विषेश आवडते.

दिपाची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे. या मालिकेतील दिपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्यारंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आलं आहे. खऱ्या आयुष्यात मात्र ती फार वेगळी दिसते. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतुन ती झळकली आहे. शिवाय ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘चाहूल’ या मालिकेतही तिनं काम केलं.

इन्स्टाग्रामवर रेश्मा ऍक्टिव्ह असते. हिंदी मालिकेमधूनही त्यांनी काम केलं आहे. ‘केसरी नंदन’ या हिंदी मालिकेतही ती मुख्य भूमिकेत दिसली. ‘लालबागची राणी’ या चित्रपटातून ती दिसली. खऱ्या आयुष्यातील दिपा सुंदर असून सोशल मीडियावर अनेक सुंदर फोटो अपलोड करत असते.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.