Home / कलाकार / या पोरामागे श्रद्धा कपूर झाली आहे वेडी

या पोरामागे श्रद्धा कपूर झाली आहे वेडी

श्रद्धा कपूर ही आता एक सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील आता खूप वाढत आहे. तिचे चाहते तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने ‘आशिकी २’ या चित्रपटापासून तिच्या करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने चांगली भूमिका साकारली आहे. ती आता एक टॉप अभिनेत्रींमध्ये आहे.

तिचे नाव बॉलीवूडमधल्या बऱ्याच व्यक्तीसोबत जोडले गेले. तिला सध्या एका व्यक्तीबरोबर खूप वेळ तिने घालवताना पाहिले आहे. ते म्हणजे कोणी नसून आपले फरहान अख्तर हे आहेत. फरहान हे अभिनेते, गायक, निर्माता आणि दिग्दर्शकही आहेत. यांना ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटांमध्ये सुपरहिट कामगिरी करताना पाहिलं आहे.

फरहान हे सुद्धा टॉप अभिनेत्यांमध्ये मोजले जातात. त्यांच्याही चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलिकडच्याच काळात फरहान आणि श्रद्धा या दोघांना बऱ्याचदा एकमेकांसोबत वेळ घालवताना पाहिले आहे. त्यांची भेट ‘रॉक ऑन २’ ची शूटिंग करताना झाली. अस बोललं जातं की, या दोघांमध्ये आता प्रेमसंबंध होत आहेत.

फरहान यांचे आधी लग्न झाले आहे पण नंतर घटस्फोटही झाला. काही लोकांचं अस म्हणणं आहे की, त्याने हा घटस्फोट श्रद्धा साठी घेतला आहे. बाहेर या दोघांच्या नात्याची बरीच चर्चा होत आहे. नंतरच्या काळात आपण बघूया की आता या दोघांचे प्रेम नवीन नात निर्माण करते की वेळेबरोबर हेही विसरलं जाईन.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.