Breaking News
Home / कलाकार / सैराट चित्रपटातील लंगड्या चे आता बदलले दिवस

सैराट चित्रपटातील लंगड्या चे आता बदलले दिवस

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या पायाने अपंग असलेल्या आणि चित्रपटात “लंगड्या बाळ्या’ या नावाने परिचित असलेला तानाजी गळगुंडे हा कलाकार मूळचा बेंबळे (ता. माढा) चा आहे. सैराट चित्रपटात परश्याचा मित्राची भूमिका करून त्याला साथ देऊन चित्रपटात हास्यकल्लोळ घडवून आणलेल्या “बाळ्या, लंगड्या उर्फ प्रदीप’ची चर्चा राज्यात सुसाट सुरू आहे.

शरीराने अपंग असलेली व्यक्ती घरात बसून राहता “अपंगत्व’ असले तरी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलेच्या माध्यमातून करिअर करता येते, हा संदेश तानाजीने समाजाला घालून दिला आहे. तानाजी सध्या टेंभुर्णी येथील महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. सैराटचित्रपटात उत्कृष्ट अभिनय करून रूपेरी पडद्यावर झळकलेल्या तानाजीने बेंबळे गावात प्रवेश करताच त्याच्या मित्र, ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.

ढोल ताशा हलग्या वाजवत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली. महिलांनी औक्षण केले. संघटना बेंबळे ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा सत्कार झाला. सरपंच तानाजी भोसले, सोमनाथ हुलंगे, सिद्धेश्वर शिंदे, नागेश मस्के, समाधान सागर उपस्थित होते. सैराटच्या यशानंतर तो ‘द कपिल शर्मा शो’, ‘ड्रामा कंपनी’, ‘कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस’, ‘सा रे गा मा पा’ यांसारख्या रियालिटी शोजमधून दिसला.

कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस, ड्रामा कंपनी मध्ये स्कीट्सही त्याने केले होतं. पण केवळ टी.व्ही. पुरत तो मर्यादित राहिला नाही. त्याने “माझा अगडबम” या सिनेमात तृप्ती भोईर आणि सुबोध भावे यांच्या सोबतही काम केलं आहे. तसचं, गेल्या डिसेंबरमध्ये “मनी मनी” या सुमित म्युजिकच्या एका गाण्यावर थिरकताना तानाजी आपल्याला दिसला होता.

पण हे तर झालं तानाजी एक अभिनेता म्हणून. तानाजी हा शेतकरी सुद्धा आहे, हे फार कमी जणांना माहिती आहे. तानाजीला शेतीची आवड आधीपासूनच होती. किंबहुना, त्याच्या अकाउंटवर Farmer and actor असं त्याच्या bio मध्ये लिहिलेलं पहायला मिळतं. तसेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरसुद्धा याचे फोटोज पहायला मिळतात. तानाजीला त्याच्या अभिनयासाठी अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे.

About nmjoke.com

Check Also

भाभी ने चालवली बुलेट रोड वर सगळे बघत राहिले

सोशल मीडियावर एक एक व्हिडिओ शेअर आणि व्हायरल होत आहेत. त्यापैकी बहुतेक असे आहेत की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *