मेलेनिया ने पण ट्रम्प ला दिला धोका देणार घटस्फोट

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांनी ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे ट्रम्प यांच्या दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर बसण्याच्या महत्त्वकांक्षेवर पाणी फेरलं गेलं.

पण, याचबरोबर आणखी एक कौटुंबिक धक्का बसण्याची शक्यता आहे. डेल मेल या वृत्तपत्रानं डोनाल्ड ट्रम्प यांना मलेनिया ट्रम्प घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त दिलं आहे. मलेनिया ट्रम्प यांच्या एका पूर्व सहयोगीच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्यानं डेल मेलनं हे वृत्त दिलं आहे.

त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेय की, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्यात १५ वर्षापूर्वी सुरु झालेलं नातं संपुष्टात येत आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला आहे. व्हाइट हाउसमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प वेगवेगळ्या खोल्यामध्ये वास्तव्यास आहेत. मेलेनिया ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये घटस्फोट आणि लग्नासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहेत.

यात मेलेनियानं मुलगा बॅरेनचा ताबा आणि संपत्तीत अर्धा वाटा मागितला आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउस सोडताच दोघांमध्ये घटस्फोट होऊ शकतो. मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्पच्या लग्नाला स्टेफनी वोल्कॉफन ट्रंजेक्शनल असं म्हटलेय. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय सहयोगी ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन यांनीही दोघांच्या नात्यात तडा गेल्याचं म्हटलेय.

ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन म्हणालेत की, १५ वर्षांपासून एकत्र असणाऱ्या ट्रम्प दाम्पत्यांच्या नातं संपुष्टात आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउसमधून बाहेर पडताच मेलेनिया घटस्फोट देईल. डोनाल्ड ट्रम्प यांचा बदला घेम्यासाठी मेलेनिया ट्रम्प सध्या रस्ता शोधत आहे. १९९८ मध्ये मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रेमप्रकरण सुरु झालं होतं. त्यावेळी ट्रम्प यांचं वय ५२ होत तर मेलेनिया याचं वय २८ होतं.

त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये फॅशन वीक सुरु होता त्यानंतर टाइम्स स्क्वेअरच्या किटकॅट क्लबमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर २००४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी १.५ मिलिअन डॉलरची डायमंड रिंग मेलेनियाला देत लग्नाची मागणी केली होती. २२ जानेवारी २००५ मध्ये दोघांनी लग्न केलं होतं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *