NMJOKE

तुझ्यात जीव रंगला मधल्या या हिरोईनचे झाले निधन

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका खूप प्रसिद्ध झाली आहे. परंतु कोरोना महामारीमुळे बऱ्याच मालिकांच्या किंवा चित्रपटांच्या शूटिंगला अडथळे येत आहेत. काही शूटिंग बंद झाल्या आहेत तर काही शूटिंगची ठिकाणे बदलली आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता चालू होऊन चार वर्षे झाली आहेत. या एवढ्या मोठ्या कालावधीत या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

राणादा आणि अंजली आता घराघरांत अगदी रुळले आहेत असं म्हणलं तर वावग नाही. तुम्हालाही या मालिकेबद्दल काय वाटते कंमेन्ट मध्ये नक्की सांगा? या २०२० वर्षी आपण सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांना गमावले आहे. याच मालिकेमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटनकर यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय ८४ वर्षे होते.

सरोज यांच वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या कामाच्या कारकिर्दीत सरोज यांनी ८५ हुन अधिक जास्त चित्रपटांसाठी काम केले आहे. त्या या कारकिर्दीत बरीच नाटकेही त्यांनी केली आहेत. न्यू भारत नाट्य क्लब यापासून त्यांनी नाटकाला सुरुवात केली आहे. ‘वेगळं व्हायचंय मला, मुंबईची माणसं, प्रेमा तुझा रंग कसा, दिवा जळुदे सारी रात, तुज आहे तुजपाशी’ अशा अनेक नाटकांमध्ये काम केले आहे.

‘ज्योतिबाचा नवस, कुंकवाचा करंडा, सुन लाडकी या घरची, एकटा जीव सदाशिव, अष्टविनायक, धुमधडका, दे दणा दण, लेक चालली सासरला’ या अशा सुपरहिट चित्रपटात सरोज यांनी अभिनय केला आहे. ‘अमृतवेल आणि तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्येही काम केले आहे. अशी ही सरोज सुखटनकर यांची चांगली आणि भरभराटीची कारकीर्द आहे.

Exit mobile version