aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

सचिन पिळगावकर ची मुलगी आहे हि अभिनेत्री

अभिनेता सचिन पिळगावकर यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या पत्नी म्हणजे सुप्रिया पिळगावकर यांनीही बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. या दोघांचाही प्रेमविवाह आहे. त्यांच्या या प्रेमाची कहाणी खूप मजेशीर आहे. या दोघांच्या प्रेमसंबधाला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटापासून झाली.

सुरुवातीला सुप्रिया यांना वाटलेले की सचिन यांच लग्न झाले आहे. परंतु जेव्हा सचिन यांनी त्यांना प्रोपोज केले त्यावेळी त्यांना समजले की सचिन यांचे लग्न नाही झाले. तरीही नंतर सुप्रिया यांनी त्यांच्या प्रोपोजचे खूप वेळाने उत्तर दिले. या दोघांनीही ‘माझा पती करोडपती, आयत्या घरात घरोबा, अशी ही बनवाबनवी, नवरा माझा नवसाचा’ असे बरेच एकत्र चित्रपट केले.

या दोघांचे लग्न १९८५ साली धुमधडाक्यात पार पडले. या दोघांनाही १९८९ साली एक मुलगी झाली जिचे नाव श्रिया आहे. चला तर मग आपण आता श्रिया पिळगावकर हिची माहिती घेऊया. श्रिया ही सुद्धा एक अभिनेत्रीच आहे. तिचा जन्म २५ एप्रिल १९८९ ला मुंबईमध्ये झाला. श्रियाने शालेय शिक्षण मुंबईमधूनच पूर्ण केले.

शाळेत असताना ती अतिशय उत्तम पोहत होती आणि तिला जलतरण स्पर्धेत पहिले बक्षीससुद्धा मिळाले. महाविद्यालयीन शिक्षण सेंट झवीयर या कॉलेजमधून पूर्ण केले. तिने सोसिओलॉजि मध्ये बीएची पदवी प्राप्त केली आहे. तिला एक ट्रान्सलेटर बनायचे होते त्यामुळे तिने जपानी भाषा शिकली. श्रिया ही प्रत्येक बाबतीत हुशार होती.

चौथीत असताना तिने दिलनाज अँड चॉकलेट केक या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. यानंतर तिने बरीच नाटके केली. तिला हॉवर्ड युनिव्हर्सिटीकडून शिष्यवृत्ती मिळाल्याने तिकडे जाऊन स्क्रीन प्लेचे शिक्षण घेतले. श्रियाने ‘एकुलती एक’ या चित्रपटापासून २०१३ मध्ये काम चालू केले. याचे निर्माते आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले होते. श्रियाच्या बऱ्याच शॉर्ट फिल्म्स प्रसिद्ध आहेत.

स्वरा या चित्रपटासाठी तिला अवॉर्डही मिळाला होता. नंतर तिने शाहरुख खानच्या फॅन या चित्रपटापासून बॉलीवूड मध्येही पदार्पण केले. त्यात तिने शाहरुखच्या प्रेयसीची भूमिका केली आहे. अनेक वेब सिरीज मध्येही तिने काम केले आणि त्यातलीच मिर्जापूर या वेब सिरीजमुळे श्रिया खूप प्रसिद्ध झाली. श्रिया पिळगावकर नेहमी अशीच यशस्वी राहावी ही सदिच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *