‘कूच कूच होता है’ मधली छोटी अंजली झाली मोठी

बॉलीवूडमध्ये बरेच अभिनेता अभिनेत्री येतात जातात. आपण अनेक बालकलाकारांना या चित्रपटात पाहता आणि त्यांचा अभिनय मन खुश करून जाते. बऱ्याच चित्रपटात आपण अतिशय उत्कृष्टरित्या ती भूमिका पार पाडणाऱ्या बालकलाकरांना पाहतो. अशाच एका बालकलाकाराबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. ‘कुछ कुछ होता है’ या करण जोहरच्या अतिशय गाजलेल्या चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकार जिचे नाव अंजली होते.

ती आता काय करते, कुठे गायब झाली आहे का याबद्दल माहिती घेणार आहोत. या चित्रपटात काम करणाऱ्या अंजलीचे खरे नाव आहे सना सईद. ‘कुछ कुछ होता है’ हा सनाचा पहिला चित्रपट होता आणि जो खूप सुपरहिट चित्रपट झाला. सना सुद्धा यानंतर एक सुपरस्टार बनली. या चित्रपटाचे चित्रीकरण १९९८ मध्ये झाले होते. सनाचा जन्म २२ सप्टेंबर १९८८ ला झाला.

तिला कुछ कुछ होता है या चित्रपटानंतर २००० मध्ये ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘बादल’ मध्येहि काम करायची संधी मिळाली. सना ही एक सुप्रसिद्ध बालकलाकार झाली होती. परंतु तिने नंतर अभिनय करणे थोड्या काळासाठी थांबवले होते कारण तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे होते. २००८ मध्ये पुन्हा काम चालू केले आणि ‘बाबुल का आंगण छुटे ना’, ‘लो हो गई पूजा इस घर की’ या मालिकेत काम केले.

नंतर २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ दि इअर’ या करण जोहरच्या हिंदी चित्रपटात काम केले. पण या चित्रपटात तिची मुख्य भूमिका नव्हती. यानंतर तिने ‘झलक दिखला जा’ मध्ये २०१३ ला भाग घेतलेला तसेच ‘नच बलिये’ यामध्ये २०१५ ला भाग घेतला. २०१६ मध्ये ‘खतरो के खिलाडी’ मध्येही सनाने भाग घेतलेला. अशा बऱ्याच कार्यक्रमात सनाने भाग घेतला. पण तिला कुछ कुछ होता है नंतर जी प्रसिद्धी मिळाली होती ती आता तिला भेटत नाहीये.

सना ही बऱ्याच गोष्टींमध्ये खूप हुशार आहे, पण तिच्यावर बॉलीवूडची कृपा होत नाही. तिने कुछ कुछ होता है या चित्रपटानंतर तिला स्वतःला वेळ घेतला नसता तर ती आज खूप प्रसिद्ध अभिनेत्री झाली असती पण तिच्यासाठी शिक्षणही खूप महत्त्वाचे होते त्यामुळे तिने शिक्षणाला अभिनयापेक्षा जास्त महत्त्व दिले. तिच्या या कष्टाला नंतर नक्कीच फळ मिळेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *