मराठमोळ्या पुष्कर श्रोत्रीची मुलगी आली वयात पहा

मराठी सिनेमा, नाटक आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. पुष्करची मुलगी शनाया नुकतीच १८ वर्षांची झाली असून तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसाचा फोटो पुष्करने नाही तर अभिनेता प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रसाद ओकने शनायाच्या १८ व्या वाढदिवसाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला असून या फोटोत पुष्करची मुलगी शनाया व पत्नी प्रांजल आणि प्रसाद ओक व त्याची पत्नी मंजिरी दिसते आहे. हा फोटो शेअर करत प्रसादने विनोदी ढंगात म्हटले की, पुष्कर श्रोत्रीची मुलगी मोठी झाली…. १८ वर्षाची… पण पुष्कर मात्र अजून…

असो अभिनेता पुष्कर श्रोत्रीने आपला अभिनय, कॉमेडीचे अफलातून टायमिंग यामुळे तो रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे.अभिनयासोबत नुकतेच त्याने सुरु केलेली मराठी सिनेदिग्दर्शक आणि निर्माता ही इनिंगही यशस्वी ठरली आहे. त्याने निर्मिती आणि दिग्दर्शित केलेल्या उबुंटू या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *