या मराठमोळ्या कलाकारांचे झाले आहेत दोन दोन लग्न

हिंदी सिनेसृष्टी असो, मराठी सिनेसृष्टी असो किंवा आपल्या आजूबाजूचा परिसरही, आपल्याला बऱ्याचसे घटस्फोट घेतलेले किंवा दुसरं लग्न केलेल्या व्यक्ती दिसतील. आज आपण इथे मराठी सिनेसृष्टीतील अशा काही जोड्यांची नावे बघणार आहे ज्यांनी आधी लग्न केलेलं आणि नंतर एकमेकांपासून दूर झाले, घटस्फोटही घेतला.

सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे लग्न १५ डिसेंबर २०१३ रोजी झाले होते. अभिनेत्री सई ताम्हणकर हिने बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. अमेय गोसावी हे सुद्धा चित्रपट सृष्टीशी संबंधित काम करतात. अमेय हे प्रोड्युसर असून त्यांची लोडिंग पिक्चर नावाची कंपनी आहे. सई आणि अमेय या दोघांनीही प्रेम विवाह केला होता. ते दोघेही लग्नाआधी तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये मध्ये होते आणि नंतर लग्नही झाले. दोघेही एकाच क्षेत्रांतील असूनही त्या दोघांनी कधीही एकमेकांबरोबर काम नाही केले. जेव्हा ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना समजली तेव्हा त्यांना धक्काच बसला होता. सईने अजूनही दुसरे लग्न केले नाही.

स्वप्नील जोशी आणि अपर्णा जोशी या दोघांनीही प्रेमविवाह केला होता. यांचे लग्न २००५ मध्ये झाले होते पण काही कारणांमुळे त्यांचे हे नाते जास्त दिवस टिकले नाही आणि २००९ मध्ये घटस्फोटही झाला. यानंतर स्वप्नील जोशीने २०११ मध्ये लीना आराध्या बरोबर लग्न केले. स्वप्नील आणि लीना यांना एक मुलगी आहे जिचे नाव मायरा असे आहे.

बिग बॉस मध्ये भाग घेतलेल्या शर्मिला राऊतचे लग्न अमेय निपाणकार यांच्याबरोबर झाले आहे. या दोघांचेही लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांचा घटस्फोट झाला. शर्मिलाने अजूनही लग्न नाही केले आणि ती सिंगलच आहे. शर्मिला ही ‘हे मन बावरे’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे.

रुपाली भोसलेला आपण बिग बॉस मध्ये पाहिले आहे. तिचे लग्न मिलिंद शिंदे यांच्याबरोबर २०१२ मध्ये झाले. काही दिवसांनी दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला. अभिनेत्री रुपाली ही सध्या अंकित मगरे याला डेट करत आहे आणि हे दोघेही कधी लग्न बंधनात अडकतात याची दर्शक वाट बघत आहेत. स्वतः रुपालीनेच ती अंकितला डेट करत असल्याचा खुलासा केला आहे.

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर हे दोघेही खऱ्या आयुष्यात लग्न बंधनात अडकले होते. परंतु नंतर काही मतभेदांमुळे त्यांच्यात घटस्फोट झाला. प्रियंका ढवळे हिच्याबरोबर शशांक केतकर याने लग्न केले. तेजश्रीने अजूनही दुसरे लग्न नाही केले.

सुप्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर यांना कोण नाही ओळखत. महेश मांजरेकर यांचाही घटस्फोट झाला आहे. पहिल्या पत्नीचे नाव दीपा होते तर दुसरे लग्न मेधा मांजरेकर हिच्याबरोबर केले. ते आता सुखी जीवन जगत आहेत.

आग्गबाई सासूबाई या मालिकेतील गिरीश ओक यांचीही दोन लग्न झाली आहेत. गिरीश ओक यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक हे आहे. या दोघांना एक मुलगी आहे जिचे नाव अभिनेत्री गिरीजा ओक बावकर हे आहे. तिचेही आता लग्न झाले आहे. गिरीश यांनी दुसरे लग्न पल्लवी ओक बरोबर केले आहे. त्यांना दुर्गा नावाची एक मुलगी आहे.

अभिनेता पियुष रानडे याचीही दोन लग्न झाली आहेत. पहिल्या पत्नीचे नाव शाल्मली टोळे आहे आणि त्यांचे लग्न २०१० मध्ये झाले. यांचा नंतर चार वर्षांनी घटस्फोट झाला. दुसरे लग्न मयुरी वाघ हिच्याबरोबर केले. अस्मिता या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली आणि तिथून नंतर हे नातं लग्नाच्या रुपात बदललं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *