अभिजित राजेंची दुसरी बायको आहे इतकी सुंदर पाहून वेडे व्हाल

‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत असून मालिकेत शेफ अभिजीत राजेच्या भूमिकेत असलेले अभिनेते गिरीश ओक यांच्या आयुष्यातील काही माहित नसलेल्या गोष्टी. ‘अग्गबाई सासुबाई’, ‘जुळून येती रेशीमगाठी’सारख्या अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेले अभिनेते, कवी, लेखक डॉ.

गिरीश ओक यांचा चाहता वर्ग मोठा आहे. असं असलं तरी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मात्र खूप कमी जणांना माहित आहे. ‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेत गिरीश ओक शेफ अभिजीत राजेच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या या भूमिकेला चाहत्यांचंही प्रचंड प्रेम मिळत आहेत. महिला नवरा असवा तर अभिजीत राजेसारखा असं म्हणताना दिसतायत.

असं असलं तरी खऱ्या आयुष्यात गिरीश ओक यांची दोन लग्नं झाली आहेत. डॉ.गिरीश ओक हे मूळचे नागपूरकर आहेत. आयुर्वेद वैद्यकीय कॉलेजमध्ये त्यांनी डॉक्टरकीची डिग्री घेतली. काही वर्ष प्रॅक्टीस केल्यानंतर त्यांनी अभिनयाकडं मार्ग वळवला. मालिका, नाटकांमधून त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. त्यानंतर पद्मश्री पाठक यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.

त्यानंतर त्यांना गिरीजा ही मुलगी झाली. परंतु काही वर्षानंतर गिरीश आणि पद्मश्री यांनी घटस्फोट घेतला. गिरीजा देखील आज मराठी सिनेसृष्टीतल प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पद्मश्री यांना घटस्फोट दिल्यानंतप २३ मार्च २००८ रोजी गिरीश यांनी पल्लवी यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना दुर्गा नावाची मुलगी आहे. टीव्हीवर सुरुवातीला दूरदर्शनच्या मालिकेत गिरीश यांनी काम केलं होतं.

पण, त्यांच्यासाठी छोट्या पडद्यावरील ओळख मिळवून देणारी मालिका होती ‘ह्या गोजिरवाण्या घरात’. या मालिकेचे त्यांनी दोन हजार पाचशे एपिसोड्स केले. ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘आराधना’, ‘पिंजरा’, ‘अग्निहोत्र’, ‘या सुखांनो या’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘अवंतिका’, ‘निवडुंग’, ‘दामिनी’ यासारख्या अनेक मालिका त्यांच्या वाट्याला आल्या.

यात त्यांनी बहुतांश भूमिका वडिलांच्याच केल्या आहेत. अजूनही टीव्हीचे काही प्रेक्षक त्यांना ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतले ‘नाना’ म्हणूनच हाक मारतात. सध्या ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत साकारत असलेल्या शेफ अभिजितलादेखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. नुकतेच मालिकेनं शंभर भाग पूर्ण केले आहेत.

रंगभूमीतील विविध टप्प्यांवर गिरीश ओक यांनी साकारलेल्या भूमिका महत्त्वपूर्ण आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेच्या ‘आली लहर केला कहर’ या सिनेमात त्यांनी एक छोटी भूमिका साकारली होती. पण, ते फार सिनेमात रमले नाहीत. ‘जसा बाप तशी पोरं’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘शिवरायांची सून ताराराणी’, ‘लावण्यवती’, ‘विश्वविनायक’, ‘सातच्या आत घरात’, ‘झुळूक’, ‘आम्ही असू लाडके’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘तानी’ यासारख्या सिनेमातून त्यांनी निवडक काम केली आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *