गोव्यामध्ये दिसले चमकते झाड पहा नक्की काय चमत्कार आहे

तुम्ही आजपर्यंत खूप प्रकारचे मशरूम खाल्ले आणि बघितले असतील. पण कधी प्रकाश देणारे मशरूम पाहिले आहेत का? अशा मशरूमना बायो-ल्यूमिनिसेंट मशरूम म्हणतात. गोव्याच्या जंगलात असा दुर्मिळ प्रकाश देणारा मशरूम आढळला आहे. रात्रीच्या अंधारात याचा रंग निळा हिरवा आणि जांभळ्या रंगासारखा चमकतो.

प्रकाश देणारा हा मशरूम गोव्याच्या म्हाडेई वाइल्डलाइफ सेंचुरी इथे पाहिला गेला. या सेंचुरीला मोलेम नेशनल पार्क किंवा महावीर वाइल्डलाइफ सेंचुरी म्हणून सुद्धा ओळखले जाते. ही सेंचुरी गोव्याच्या पश्चिमी घाटावर आहे. हा मशरूम सर्वसामान्य मशरूम सारखाच दिसतो पण रात्री हा चमकतो. वन्यजीव तज्ञ या प्रजातील माइसेना जीनस म्हणतात.

हे मशरूम रात्री प्रकाश देतात कारण यावर असलेले बी किड्यांच्या मार्फत दुसरीकडे पसरावे आणि त्या मशरूमची संख्या वाढावी. त्यांची संख्या वाढवण्यासाठी मशरूम किड्यांची मदत घेतात. ही एक विशिष्ट प्रकारची बुरशी आहे. आत्तापर्यंत अशा प्रकाश देणाऱ्या ५० जातींची संशोधकांना माहिती आहे. गोव्यामध्ये हे मशरूम फक्त पावसाळ्याच्या दिवसात दिसतात.

ह्यांची वाढ होण्यासाठी जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे असते. या मशरूमसाठी २१ डिग्री ते २७ डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते. महावीर वाईल्डलाईफ सेंचुरी मध्ये पावसाळ्याच्या दिवसात हे मशरूम खूप मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. यांना शोधायला एवढे अवघड नाहीये पण हे पाहण्यासाठी तुम्हाला रात्रीच्या वेळी जंगलात जावे लागते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *