या हिरोईनसाठी पागल झालेल्या गोविंदा ने स्वतःचा झालेला साखरपुडा देखील मोडलेला

९० च्या दशकातली प्रसिद्ध अभिनेत्र्यांपैकी नीलम कोठारी ही एक आहे. नीलमचा जन्म ९ नोव्हेंबर १९६९ साली हॉंगकॉंग मध्ये झाला. शिक्षण आणि पालनपोषण हे बँकॉक मध्ये झाले. तिला आता ९ नोव्हेंबरला ४९ वर्षे पूर्ण होतील. नीलम बऱ्याच वर्षांपासून बॉलीवूडपासून लांब आहे कारण तिला तिच्या कुटुंबाची काळजी घ्यायची होती.

तिचे गोविंदाबरोबरचे बरेचसे चित्रपट प्रसिद्ध आहेत. नीलम जेव्हा एकदा मुंबईला फिरायला आलेली होती त्यावेळी दिग्दर्शक रमेश बहल यांनी तिला पाहिले आणि ते तिचे सौंदर्य पाहून चकित झाले. त्यानंतर त्यांनी तिला त्यांच्या चित्रपट काम करण्याची संधी दिली. नीलमचा पहिला चित्रपट ‘ज वानी’ हा साल १९८४ मध्ये आला.

यामध्ये ती करण शाहच्या विरोधात उभी असलेली तुम्हाला दिसेन. हा चित्रपट एवढा चालला नाही परंतु प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचे खूप कौतुक केले. यानंतर तिने नेहमी यश मिळवले आहे आणि कधी मागे नाही पाहिले. नीलमने गोविंदाबरोबर १० चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्यापैकी ६ चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर खूप चालले.

नीलमचा शेवटचा चित्रपट ‘कसम’ हा २००१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. जर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलाल तर गोविंदाबरोबरच्या प्रेमसंबंधामुळे ती खूपच चर्चेत आली होती. गोविंदा आणि नीलम एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दुसरीकडे गोविंदा आणि सुनीता या दोघांचा साखरपुडाही घरच्यांनी केला होता. अस असून ही गोविंदा नीलमला डेट करत होते.

गोविंदाने त्यांचा सुनीता बरोबरचा साखरपुडाही नीलमसाठी तोडला होता. परंतु गोविंदाच्या आईने सुनीताला वचन दिलेलं की ती त्याचे लग्न फक्त सुनीताबरोबरच लावून देईन. नंतर आईखातर गोविंदाने तिच्याबरोबर ब्रेकअप केले आणि सुनीताबरोबर लग्न केले. नीलमने २०११ मध्ये अभिनेता समीर सोनीबरोबर लग्न केले.

नीलम ‘हम साथ साथ है’ चित्रपटात सलमान खानच्या बहिणीची भूमिका निभावताना दिसल्या . नीलमने ‘एक लड़का एक लड़की’, ‘इल्जाम’, ‘एक था राजा’ आणि ‘सिंदूर’ यांसारख्या बऱ्याच चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *